Shocking: Because of this actor Salman Khan cut from 'Race 4' | Shocking : या अभिनेत्यामुळे सलमान खानचा 'रेस ४'मधून पत्ता कट
Shocking : या अभिनेत्यामुळे सलमान खानचा 'रेस ४'मधून पत्ता कट

ठळक मुद्देरेस 4मध्ये सलमान खान ऐवजी दिसू शकतो सैफ अली खानसलमान खान करतोय भारत चित्रपटाचे चित्रीकरण

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा 'रेस ३' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर 'रेस ४' चित्रपटातून त्याचा पत्ता कट करण्यात आला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटानंतर लगेचच तो 'दबंग ३'च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. 

एका माध्यमाच्या रिपोर्टनुसार, 'रेस ४'मधून सलमान बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागेवर आता सैफ अली खानची वर्णी लागली आहे. 'रेस' सीरिजचे निर्माते लवकरच 'रेस ४'च्या तयारीला लागले आहेत. यात सैफची भूमिका राहणार असल्याचे बोलले जात आहे. सैफ अली खानने 'रेस' आणि 'रेस २'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले होते. 'रेस ३'मध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने जरी यश मिळविले असले, तरी प्रेक्षकांचा या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता सलमानच्या जागी पुन्हा सैफला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. 

सलमान खानचा 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सध्या सलमान खान प्रचंड मेहनत घेतोय. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहत आहेत. 


Web Title: Shocking: Because of this actor Salman Khan cut from 'Race 4'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.