धीस इज मी...! शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टीजर आऊट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 02:48 PM2019-04-08T14:48:38+5:302019-04-08T14:49:52+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कबीर सिंह’चा टीजर अखेर रिलीज झाला.

shahid kapoor and kiara advani film kabir singh teaser out | धीस इज मी...! शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टीजर आऊट!!

धीस इज मी...! शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टीजर आऊट!!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘कबीर सिंह’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कबीर सिंह’चा टीजर अखेर रिलीज झाला. ‘कबीर सिंह’ हा साऊथचा सुपरडुपर हिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. त्यामुळे प्रत्येकजण तो पाहण्यास उत्सुक आहे. ‘मी असाच बंडखोर नाही... हा मी आहे...,’ असे लिहित शाहिदने ‘कबीर सिंह’चा टीजर शेअर केला आहे.
हा टीजर बघता क्षणी प्रेमात पाडतो. शाहिद कपूर पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणार, हे टीजरची पहिली फ्रेम पाहिल्यानंतर लक्षात येते. शाहिदने आपल्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप सिनेमे दिलेत. पण तरिही त्याच्या अदाकारीसाठी कौतुक हे झालेच. ‘कबीर सिंह’मधील त्याचा अभिनयही याच तोडीचा दिसतोय.




या चित्रपटात शाहिदच्या अपोझिट कियारा अडवाणीची वर्णी लागली आहे. टीजरमध्ये कियारा अगदी काही सेकंदापुरती दिसते. पण यातही तिच्या चेह-यावरचे भाव मन जिंकून घेतात. टीजरच्या शेवटी शाहिद तिला किस करतो आणि ‘किसी ने नहीं देखा’ असे म्हणतो. यावेळचे कियाराच्या चेह-यावरचे भाव अप्रतिम आहेत. कियाराला दीर्घकाळापासून अशा एका भूमिकेची गरज होती. कदाचित ‘कबीर सिंह’च्या निमित्ताने तिला एक मोठी संधी मिळाली आहे.
 ‘कबीर सिंह’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपटही संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.  

Web Title: shahid kapoor and kiara advani film kabir singh teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.