बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सान्या मल्होत्राने 'या' क्षेत्रात आजमावले होते नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 07:05 PM2019-03-12T19:05:17+5:302019-03-12T19:10:44+5:30

सान्या लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत 'फोटोग्राफ' चित्रपटात झळकणार आहे. हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे.

sanya-malhotra-reveals-she-got-rejected-on-dance-india-dance | बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सान्या मल्होत्राने 'या' क्षेत्रात आजमावले होते नशीब

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सान्या मल्होत्राने 'या' क्षेत्रात आजमावले होते नशीब

googlenewsNext
ठळक मुद्देसान्या आहे उत्तम डान्सर सान्याने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना दिलेत डान्सचे धडे

अभिनेत्री सान्या मल्होत्राने 'दंगल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर तिने अधिराज्य गाजवले. सान्या उत्तम डान्सरदेखील आहे. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी डान्सिंग क्षेत्रात नशीब आजमावले होते. पण, अभिनयातून तिच्या कारकीर्दीला सुरूवात झाली. 


सान्याने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना डान्सचे धडे देखील दिले आहेत. बॉलिवूडमध्ये येण्याआधी डान्स इंडिया डान्स या लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये तिला झळकायचे होते. मात्र तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. लोकांना सांगायला माझ्याकडे कोणतीही भावनिक गोष्ट नव्हती म्हणून मला शोमध्ये घेतले नसल्याचे ती सांगते. 


तिने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच्या तिच्या उमेदीच्या काळाबद्दल अनेक गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या. ती म्हणाली की, 'मला डान्सची आवड होती. पालक मला अनेक कार्यक्रमात घेऊन जायचे तिथे मला सर्वांसमोर डान्स करून दाखवायला सांगायचे. मला ते करायला खूप आवडायचे. चित्रपटात येण्यापूर्वी मी डान्स इंडिया डान्ससाठी ऑडिशनही दिले होते. मी उत्तम डान्स करायचे मात्र माझी या शोसाठी निवड झाली नाही. आजकालच्या रिएलिटी शोमध्ये स्पर्धकांकडून ज्या भावनिक कथेची अपेक्षा असते अशी कथा माझ्याजवळ नव्हती. माझे आयुष्य साधे सरळ होते म्हणूनच माझी निवड करणे टाळले.'


सान्या लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत 'फोटोग्राफ' चित्रपटात झळकणार आहे. हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे. सान्या दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. गुजराती मुलीची भूमिका साकारण्यासाठी तिने भाषेवर विशेष मेहनत घेतली. 

Web Title: sanya-malhotra-reveals-she-got-rejected-on-dance-india-dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.