SANJAY LEELA BHANSALI BIRTHDAY : भव्यदिव्य सिनेमांचा अस्सल भारतीय दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 07:08 AM2017-02-24T07:08:57+5:302017-02-24T13:27:22+5:30

काही लोकांची महत्त्वकांक्षा कधीच थोड्यावर भागत नाही. त्यांच्या स्वप्नांची व्याप्ती नेहमीच कल्पनाविश्वाच्या मार्यादा ओलांडून जाणाऱ्या असतात. असाच एका व्यक्ती ...

SANJAY LEELA BHANSALI BIRTHDAY: A genuine Indian director of grand cinematic | SANJAY LEELA BHANSALI BIRTHDAY : भव्यदिव्य सिनेमांचा अस्सल भारतीय दिग्दर्शक

SANJAY LEELA BHANSALI BIRTHDAY : भव्यदिव्य सिनेमांचा अस्सल भारतीय दिग्दर्शक

googlenewsNext
ही लोकांची महत्त्वकांक्षा कधीच थोड्यावर भागत नाही. त्यांच्या स्वप्नांची व्याप्ती नेहमीच कल्पनाविश्वाच्या मार्यादा ओलांडून जाणाऱ्या असतात. असाच एका व्यक्ती म्हणजे संजय लीला भंसाळी. अस्सल भारतीय कथानकावर भव्यदिव्य चित्रपटांच्या निर्मितीसाठी ते प्रसिद्ध आहेत. ‘हम दिल दे चुके  सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ अशी काही उदाहरणे त्यांचे हिंदी चिद्धपटसृष्टीतील स्थान अढळ करतात.

अशा या बहुआयामी दिग्दर्शकाचा आज ५४वा वाढदिवस. ‘पद्मावती’ चित्रपटामुळे ते अलिकडे फार चर्चेत आहेत.‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर राजपूत संघटना ‘करणी सेने’ने त्यांना मारहाण केली. परंतु वादाशी त्यांचे नाते काही नवीन नाही. पडद्या मागील या अवलिया कलाकाराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही रंजक फॅक्ट्स-

तत्पूर्वी हॅपी बर्थडे संजय लीला भंसाळी!

१. भंसाळींचे चित्रपट जरी भव्य असले, त्यांच्या सिनेसौंदर्य अभिरुची जरी फार चोखंदळ असली तरी खासगी जीवनात ते फार साधेपणाने राहतात. सेटवर असताना ते केवळ आईने बनविलेले गुजराती जेवण करतात.

२. त्यांचे वडील अयशस्वी निर्माते होते. परंतु वडिलांचे सिनेप्रेम त्यांना बाळकडू म्हणून मिळाले. लहानपणापासून संजय यांना चित्रपटांचे वेड लागले. ते मित्रांमध्ये रमण्यापेक्षा चित्रपट पाहण्यातच समाधान मानायचे.

३. फिल्म प्रोड्युसर म्हणून वडिलांच्या अपयाशामुळे त्यांना मुंबईतील भुलेश्वर येथील चाळीत राहायला जावे लागले.

Sanjay Bhansali

४. भंसाळींना लहानपणी शाळेत जाताना मुंबईतील प्रसिद्ध वेश्यावस्ती कामठीपुऱ्यातून जावे लागायचे. त्यावस्तीतील दृश्ये कायमी माझ्या मनात कोरल्या गेल्याचे ते सांगतात.

५. आपल्या नावात आईचे नाव लावणाऱ्या भंसाळींची आई एक उत्तम डान्सर होती. संगीताचे बाळकडू त्यांना घरच्यांकडूनच मिळाले होते.

६. लहानपणी त्यांच्याकडे एक रेडिओ होता ज्यावर ते महिनो-महिने आपल्या आवडत्या गाण्याची वाट पाहत बसायचे.

७. रेडिओवर गाणे ऐकत असताना त्यांच्या डोक्यात लगेच विचारचक्र सुरू व्हायचे की, मी असतो तर हे गाणे कसे चित्रित केले असते.

८. त्यांचा चित्रपट ज्या शुक्रवारी रिलीज होतो त्यादिवशी ते कोणाचाच फोन उचलत नाहीत. त्याचे कारण की, त्यांचा पहिला चित्रपट ‘खामोशी’ हा बॉक्स आॅफिसवर सपशेल पडला होता. त्यांच्या प्रोड्युसरने फोन करून त्यांना सांगितले होते की, ‘अपनी पिक्चर बैठ गई’. याचा त्यांना एवढा धसका घेतला की, आजही ते चित्रपटाच्या पहिल्या शुक्रवारी फोनला उत्तर देत नाही.

९. दिग्दर्शक होण्यापूर्वी भंसाळी विधू विनोद चोप्रा यांच्या चित्रपटांत गाणे चित्रित करायचे.

ALSO READ: ​जयपूरचे राजघराणे करणार संजय लीला भंसाळीवर शिस्तभंगाची करवाई

Web Title: SANJAY LEELA BHANSALI BIRTHDAY: A genuine Indian director of grand cinematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.