या कारणामुळे मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या पूजा डडवालने मानले सलमानचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:34 PM2018-08-09T13:34:16+5:302018-08-09T13:35:19+5:30

पूजा डडवालची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पूजाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने तिने लोकांकडे मदत मागितली होती. तिचा मदत मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

Salman Khan's Veergati Co-Star Pooja Dadwal, After Beating Tuberculosis said Survived Only Because Of salman | या कारणामुळे मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या पूजा डडवालने मानले सलमानचे आभार

या कारणामुळे मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या पूजा डडवालने मानले सलमानचे आभार

googlenewsNext

वीरगती या चित्रपटात सलमान खानसोबत आपल्याला पूजा डडवाल ही नायिका पाहायला मिळाली होती. पूजा कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण काही महिन्यांपूर्वी पूजा डडवाल हे नाव चर्चेत आले होते. पूजा गेल्या कित्येक दिवसांपासून शिवडी येथील एका रुग्णालयातील जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होती. पूजाला टीबी झाला होता आणि त्यामुळे तिचे वजन दिवसेंदिवस कमी होत होते. तिला प्रचंड अशक्तपणा देखील आला होता. तिच्यावर तातडीने योग्य उपचार करणे गरजेचे होते. पण तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पूजाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने तिने लोकांकडे मदत मागितली होती. तिचा मदत मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

पूजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वीरगती या चित्रपटातील तिचा सहकलाकार सलमान खान तिच्या मदतीसाठी पुढे आला होता. त्याच्या बीईंग ह्युमन या संस्थेने पूजाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च केला. पूजाची तब्येत आता सुधारली असून तिला शिवडीतील रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूजा आजारी पडण्यापूर्वी गोव्यात राहात होती. ती तिथे एक कॅसिनो चालवायची. पूजाला डिस्चार्ज दिल्यानंतर आता ती गोव्याला परत गेली असून तिने जायच्या आधी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली आहे. तिने मुलाखतीत सांगितले आहे की, केवळ सलमानमुळे आज मी जिवंत आहे. मी आजारी पडली, त्यावेळी माझ्याकडे उपचारासाठी अजिबात पैसे नव्हते. माझ्या जवळच्या व्यक्तींनी देखील यावेळी मला साथ सोडली होती. योग्य उपचार न मिळाल्याने माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती. पण सलमानच्या फाऊंडेशनने माझ्या उपचाराचा पूर्ण खर्च केला. एवढेच नव्हे तर मला कपडे, साबण या सगळ्याच गोष्टी त्याच्या फाऊंडेशनने पुरवल्या. त्यामुळे मी आयुष्यभर त्याची ऋणी राहिन. 

सलमान खानने मदत करण्याआधी अभिनेता रवी किशनने देखील पूजाला काही पैशांची मदत केली होती. पूजा आणि रवी यांनी अनेक वर्षांपूर्वी एका चित्रपटात काम केले होते. 

Web Title: Salman Khan's Veergati Co-Star Pooja Dadwal, After Beating Tuberculosis said Survived Only Because Of salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.