लिप लॉक सीनमुळे या अभिनेत्रीनं सोडला विजय देवरकोंडाचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:01 PM2019-07-17T17:01:10+5:302019-07-17T17:01:35+5:30

दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा लवकरच 'डियर कॉमरेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

sai pallavi declined vijay devarakonda film dear comrade due to the liplock scene | लिप लॉक सीनमुळे या अभिनेत्रीनं सोडला विजय देवरकोंडाचा सिनेमा

लिप लॉक सीनमुळे या अभिनेत्रीनं सोडला विजय देवरकोंडाचा सिनेमा

googlenewsNext

दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा लवकरच 'डियर कॉमरेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रोमो व गाण्यांमुळे हा सिनेमा खूप चर्चेत आहे. पण त्याहीपेक्षा या चित्रपटातील विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांच्यातील लिप लॉक सीननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तेलुगू मीडियामध्ये सध्या चर्चा रंगली आहे की किसिंग सीनमुळे साई पल्लवीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'डियर कॉमरेड' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच असं वृत्त येत आहे की, या चित्रपटाची ऑफर अभिनेत्री साई पल्लवीला केली होती. मात्र तिने या चित्रपटात लिप लॉक सीन असल्यामुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये लिप लॉक सीन दाखवण्यात आला आहे.


आईबी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, साई पल्लवी चित्रपटातील इंटिमेट सीन व लिप लॉक सीन करण्यामध्ये कम्फर्टेबल नव्हती. त्यानंतर रश्मिका मंदानाचे नाव फायनल करण्यात आलं. तिला लिप लॉक सीनचा काहीही प्रॉब्लेम नव्हता. 


'डियर कॉमरेड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून या चित्रपटातील काही सीन चर्चेत आहे.

लिपलॉक सीनबद्दल अभिनेता विजयने आपले मत व्यक्त केलं आहे. त्याचं म्हणणं आहे की मला लिप लॉक शब्दापासून प्रॉब्लेम आहे. ज्या पद्धतीने त्याला लिहिलं जातं ते चुकीचं आहे. हेदेखील तसेच असते जसा राग असतो, रडणं असतं. हा देखील चित्रपटाचा सीन आहे. 


डियर कॉमरेड चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: sai pallavi declined vijay devarakonda film dear comrade due to the liplock scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.