Raveena Tandon will appear in the role of 'O' in the sequel | अंदाज अपना अपनाच्या सिक्वलमध्ये रवीना टंडन दिसणार 'या' भूमिकेत

अंदाज अपना अपना हा चित्रपट नव्वदीच्या दशकात प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफसवर कमाल दाखवू शकला नाही. पण आज तो अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, करिश्मा कपूर, रवीना टंडन, शक्ती कपूर आणि परेश रावल प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचा सिक्वल बनवला जावा असे या चित्रपटाच्या अनेक चाहत्यांना वाटत आहे. या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे आमिर खान, सलमान खान यांना अनेकवेळा विचारण्यातदेखील आले आहे. त्यावर त्यांनीदेखील या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करायला आवडेल असे म्हटले आहे.
रवीना टंडन सध्या तिच्या मातृ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी या चित्रपटाचा सिक्वल बनवला गेल्यास या चित्रपटाचा ती नक्कीच भाग असणार असेल असे ती सांगते. तसेच या चित्रपटातील तिची भूमिका खूप खास असणार असल्याची ती सांगते. या चित्रपटाच्या सिक्वलविषयी ती सांगते, "या चित्रपटाचा सिक्वल आल्यास मी या चित्रपटात नक्की असेन. पण मला माहीत आहे की, या चित्रपटात केवळ माझा आणि करिश्माचा फोटो दाखवला जाईल. आमच्या दोघांचा फोटो भिंतीवर लटकवलेला असेल आणि तो पाहत सलमान-आमिर म्हणतील की, आमच्या पत्नींचे निधन झाले आहे, आता आम्ही काय करू? आणि काहीच क्षणात ते 21 वर्षांच्या नायिकांच्या मागे फिरताना आपल्याला दिसतील. बहुधा या चित्रपटाची सुरुवातच अशी असेल."

Web Title: Raveena Tandon will appear in the role of 'O' in the sequel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.