रणबीर कपूर आणि आलिया भट बल्गेरियामध्ये घालवत आहेत एकत्र वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:11 PM2018-08-03T13:11:23+5:302018-08-03T13:13:22+5:30

रणबीर आणि आलियाचा बल्गेरियातील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते दोघे पबमध्ये दिसत असून रणबीरने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोत त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सनाही दिसून येत आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt are spending time together in Bulgaria | रणबीर कपूर आणि आलिया भट बल्गेरियामध्ये घालवत आहेत एकत्र वेळ

रणबीर कपूर आणि आलिया भट बल्गेरियामध्ये घालवत आहेत एकत्र वेळ

googlenewsNext

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या प्रेमकथेची सध्या चांगलीच चर्चा आहे. ते सध्या दोघे सगळीकडे एकत्र दिसतात. सोनम कपूरच्या लग्नात त्या दोघांनी एकत्र हजेरी लावल्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. आलिया रणबीरच्या कुटुंबियांसोबत देखील वेळ घालवताना दिसली होती. सध्या ते दोघे ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे चित्रीकरण बल्गेरिया येथे करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून ते दोघे एकमेकांसोबत चांगलाच वेळ घालवत आहेत.
 
रणबीर आणि आलियाचा बल्गेरियातील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते दोघे पबमध्ये दिसत असून रणबीरने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोत त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सनाही दिसून येत आहे. पुनीत सैनीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील हे फोटो असल्याचे म्हटले जात आहे. पुनित हा प्रसिद्ध मेकअप मन आहे. हा फोटो कित्येक दिवसांपूर्वीच काढण्यात आलेला आहे. पण तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते दोघे एकत्र खूपच छान दिसत असल्याचे त्यांच्या फॅन्सने म्हटले आहे.

जवळपास दीड शतकानंतर ही जोडी सिल्वर स्क्रिनवर एकत्र येतेय. दोघे अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र दिसणार आहेत. ब्रह्मास्त्र एक ट्रायोलॉजी चित्रपट आहे. म्हणजे, या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक असे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. याच्या पहिल्या भागाचे शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट २०१९ च्या १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

रणबीर कपूरच्या प्रेमात पडण्याआधी आलिया भट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. दोघांना अनेक इव्हेंट्समध्ये एकत्र बघण्यात आले होते. पण दोघांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं नव्हतं. तर रणबीर कपूरचे नाव आजवर सोनम कपूर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. 

आता आलिया आणि रणबीरच्या अफेअरच्या चर्चांवर त्यांनी मौन राखणेच पसंत केले आहे. पण त्यांच्या नात्याला त्यांच्या दोघांच्या कुटुंबियांकडून संमती असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Ranbir Kapoor and Alia Bhatt are spending time together in Bulgaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.