प्रियंका चोप्राचे मियामी बीचवरचे 'ते' फोटो होतायेत सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:43 AM2019-03-25T11:43:04+5:302019-03-25T11:44:22+5:30

प्रियंका चोप्रा सध्या निक जोनससोबत  क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. प्रियंका आणि निक मियामी बीचवर एकमेकांची कंपनी एन्जॉय करतायेत.

Priyanka chopra is currently chilling with nick jonas at miami beach | प्रियंका चोप्राचे मियामी बीचवरचे 'ते' फोटो होतायेत सोशल मीडियावर व्हायरल

प्रियंका चोप्राचे मियामी बीचवरचे 'ते' फोटो होतायेत सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत

प्रियंका चोप्रा सध्या निक जोनससोबत  क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. प्रियंका आणि निक मियामी बीचवर एकमेकांची कंपनी एन्जॉय करतायेत. सोशल मीडियावर त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत एडीन खेळताना दिसतोय. त्यामुळे या ट्रीममध्ये प्रियंका आणि निक एकटेच गेले नाहीत तर त्यांच्यासोबत हॉलिवूड सिंगर आणि क्लोज फ्रेंड इरफानसुद्धा दिसतोय. एका फोटोमध्ये प्रियंका सोबत एका बाजूला निक आणि दुसऱ्याला बाजूला इरफान दिसतोय. या फोटोला तिने 'माय बॉयज'असे कॅप्शन दिलंय.  


प्रियंकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच शोनाली बोसच्या 'द स्काई इज पिंक' सिनेमात दिसणार आहे.  या सिनेमा प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. संजय लीला भन्साळी यांनी काही दिवसांपूर्वी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. लवकरच ते एका नव्या सिनेमासंदर्भात प्रियंकाशी बोलणार आहेत. असे झाले तर बाजीराव मस्तानीनंतर प्रियंका पुन्हा एकदा भन्साळींच्या सिनेमात दिसेल.

Web Title: Priyanka chopra is currently chilling with nick jonas at miami beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.