दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास लवकरच 'साहो' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे. 'साहो' हा बिग बजेट चित्रपट असून यात रसिकांना अॅक्शनची मजा लुटायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रभास व श्रद्धा काम करताना दिसणार आहे. या चित्रपटातील नुकताच त्या दोघांचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे. 


'साहो' चित्रपटातील श्रद्धा व प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा फोटो या चित्रपटातील एका गाण्यादरम्यानचा आहे. या फोटोत श्रद्धा गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये क्यूट दिसते आहे तर प्रभास पांढऱ्या रंगाच्या टीशर्टमध्ये रोमँटिक अंदाजात दिसतो आहे.


'साहो'चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. मात्र या टीझरमध्ये आपल्याला एकही रोमँटिक दृश्य पहायला मिळत नाही. टीझर अॅक्शनने परिपूर्ण आहे. अशातच हा फोटो पाहून श्रद्धा आणि प्रभासच्या चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीन वाढली आहे. श्रद्धा व प्रभास यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.


 'साहो'चे दोन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. एक टीझर प्रभासच्या वाढदिवसादिवशी तर दुसरा टीझर श्रद्धाच्या वाढदिवशी समोर आला.

या चित्रपटात भरपूर अॅक्शन सीन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सीन्स हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट मॅन डायरेक्टर कैनी बेट्स यांच्या देखरेखीखाली शूट केले गेले आहेत. कैनी हे हॉलिवूडचे खूप प्रसिद्ध अॅक्शन डिरेक्टर आहेत. त्यांनी फास्ट अँड फ्यूरिअस सारख्या चित्रपटांचे अॅक्शन डिरेक्शन केलेले आहे.

‘साहो’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून हा चित्रपट तेलुगू, तमीळ आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात श्रद्धा आणि प्रभास यांच्यासोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Prabhas and Shraddha Kapoor's romantic photo, photo-taking viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.