pati patni aur who kartik aaryan bhumi pednekar and ananya pandey starrer film release date confirmed | ‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!!
‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!!

ठळक मुद्दे१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

कार्तिक आर्यन, अनन्या पांडे व भूमी पेडणेकर लवकरच ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. कार्तिक व अनन्या या चित्रपटात पती-पत्नीच्या भूमिकेत असतील तर भूमी ‘वो’च्या भूमिकेत दिसेल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आणि प्रेक्षक चित्रपटाच्या प्रेमात पडले. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, या बातमीनुसार, आता हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी नाही तर याच वर्षी ६ डिसेंबरला प्रदर्शित होईल. याचा अर्थ नियोजित रिलीज डेटच्या महिनाभरआधीच प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.
१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. साहजिकच रिमेकमध्ये या कथेला आताच्या ट्रेंड्नुसार नवीन लूक देण्यात येणार आहे. टी-सीरिज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत निर्मित हा चित्रपट मुदस्सर अजीज दिग्दर्शित करत आहेत.
या चित्रपटासाठी आधी तापसी पन्नूचे नाव फायनल करण्यात आले होते. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावर तापसीचा पार चांगलाच चढला आहे.


Web Title: pati patni aur who kartik aaryan bhumi pednekar and ananya pandey starrer film release date confirmed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.