Oops! जान्हवी कपूरला पाहून पापाराझींना आठवली सारा अली खान...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:41 PM2019-01-22T12:41:20+5:302019-01-22T12:41:25+5:30

लेक जान्हवी कपूरच्या फिल्मी करिअरबद्दल पापा बोनी कपूर चिंतीत असल्याची बातमी आपण काल-परवाचं वाचली असेल. या चिंतेचे मूळ कारण होते, सारा अली खान.

Oops! Paparazzi mistake Janhvi Kapoor for Sara Ali Khan | Oops! जान्हवी कपूरला पाहून पापाराझींना आठवली सारा अली खान...!!

Oops! जान्हवी कपूरला पाहून पापाराझींना आठवली सारा अली खान...!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास जान्हवी कपूर ‘तख्त’ या चित्रपटात बिझी आहे.२०२०मध्ये प्रदर्शित होणाºया या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे.

लेक जान्हवी कपूरच्या फिल्मी करिअरबद्दल पापा बोनी कपूर चिंतीत असल्याची बातमी आपण काल-परवाचं वाचली असेल. या चिंतेचे मूळ कारण होते, सारा अली खान. होय, सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींनी थोड्या फार फरकाने एकाचवेळी बॉलिवूड डेब्यू केला. पण यादरम्यान सारा जान्हवीच्या बरीच पुढे निघून गेली. जान्हवीचा ‘धडक’ रिलीज झाला. पाठोपाठ साराचा ‘केदारनाथ’. दोघींच्या या डेब्यू चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण ‘केदारनाथ’नंतर लगेच साराचा ‘सिम्बा’ रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली. साहजिकचं या चित्रपटानंतर सारा जान्हवीच्या बरीच पुढे निघून गेली. 

आता तर सगळ्यांच्या तोंडी साराचेच नाव आहे. अगदी जान्हवीलाही लोक सारा म्हणून बोलवू लागले आहेत. होय, अगदी अलीकडे असेच झाले. जान्हवी कपूर ही नेहा धूपियाच्या टॉक शोच्या शूटींगसाठी आपल्या व्हॅनिटीमधून बाहेर निघत असताना मीडियाच्या एका फोटोग्राफरने जान्हवीला सारा म्हणून आवाज दिला. एकदा नाही तर अनेकदा, जान्हवीला तो सारा...सारा...म्हणून बोलवताना दिसला. अर्थात जान्हवीने ही गोष्ट जराही मनावर न घेता, हसण्यावर नेली. ‘जान बूझ के बोला आपने....’, असे ती हसत हसत म्हणाली. 


तूर्तास जान्हवी कपूर ‘तख्त’ या चित्रपटात बिझी आहे.२०२०मध्ये प्रदर्शित होणाºया या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. हा चित्रपट संपण्याआधीच जान्हवीच्या तिस-या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. होय, सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Oops! Paparazzi mistake Janhvi Kapoor for Sara Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.