‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या खोलीत का यायची प्रत्येक सौंदर्यवती? काय होता हेतू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 10:12 IST2017-11-28T04:40:30+5:302017-11-28T10:12:46+5:30
‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर मायदेशी परतली आहे. मानुषीने सोमवारी मुंबईत मीडियाशी संवाद साधला. यावेळी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतील ...

‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या खोलीत का यायची प्रत्येक सौंदर्यवती? काय होता हेतू?
‘ िस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर मायदेशी परतली आहे. मानुषीने सोमवारी मुंबईत मीडियाशी संवाद साधला. यावेळी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतील अनेक किस्से व अनुभव तिने मीडियाशी शेअर केलेत. ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य देशांच्या सौंदर्यवतीही मला माझ्या सारख्याच, माझ्यातल्याच वाटल्या. आम्हा अनेकींना एकमेकींची भाषा कळत नव्हती. पण तरिही सर्वजणी परस्परांच्या मदतीसाठी सज्ज असायच्या. अनेकींना मी बॉलिवूड अभिनेत्री आहे, असेच आधी वाटले होते. आमच्यात कुठलाही पूर्वग्रह नव्हता. सर्वजणी अगदी खुल्या मनाने स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, असे मानुषीने सांगितले.
![]()
मी भारतातून एक सुटकेस भरून खाण्याचे पदार्थ घेऊन गेले होते. माझ्या सुटकेसमध्ये भारतीय खाद्य पदार्थ आहे, हे कळल्यावर सर्व सौंदर्यवती माझ्या खोलीत तळ ठोकून असायच्या. भूक लागली की, त्या माझ्या खोलीत यायच्या, अशी एक आठवणही तिने सांगितले.
‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकल्यानंतर मानुषी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार का? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना मानुषीने अनेकांची काहीसी निराशा केली. तूर्तास तरी बॉलिवूडमध्ये जाण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. सध्या मी माझ्या सोशल कँम्पेनवर लक्ष देऊ इच्छिते. ग्रामीण भागांतील महिलांमध्ये जनजागृतीची गरज आहे. सध्या तरी मी यावरच लक्ष केंद्रीत करणार आहे, असे तिने सांगितले.
ALSO READ : SEE PICS : ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकणा-या मानुषी छिल्लरबद्दल काही खास गोष्टी...!
मानुषी ही शक्ती प्रकल्पावर काम करते. या प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांमध्ये सॅनिटरी पॅडच्या वापराबद्दल जनजागृतीचे काम केले जाते. करिअरसंदर्भात विचारले असता मी डॉक्टरी पेशात जाऊ इच्छिते, असे मानुषीने सांगितले. तुझी आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण? असे विचारले असता मानुषीने थेट उत्तर देणे टाळले. सर्वच अभिनेत्री सुंदर आहेत. मला सर्वच आवडतात. त्यामुळे कुण्या एकीचे नाव घेणे अवघड आहे, असे ती म्हणाली. अभिनेत्याबद्दल सांगायचे तर मला आमिर खानसोबत चित्रपटात काम करायला आवडेल. कारण तो सामाजिक मुद्यांवर चित्रपट बनवतो, असे मानुषीने सांगितले. ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकल्यानंतर मी भारतात येण्यास प्रचंड उत्सूक होते. विमानात मी एक एक मिनिट मोजत होते. मायदेशी आल्यावर मला खूप प्रेम मिळाले, असे ती म्हणाली.