ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:00 AM2019-03-14T06:00:00+5:302019-03-14T06:00:02+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय.

keerthy suresh to make her bollywood debut with ajay devgns sports drama | ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!!

ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!!

googlenewsNext
ठळक मुद्देकिर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले.

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय. होय, ताज्या बातमीनुसार, माजी फुटबॉलपटू सैय्यद अब्दुल रहीमच्या बायोपिकमध्ये किर्तीची वर्णी लागली आहे.
या बायोपिकबद्दल आणखी एक खास बातमी सांगायची झाल्यास, अजय देवगण यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजयची हिरोईन म्हणून किर्तीचे नाव फायनल झाले आहे. खुद्द किर्तीने या वृत्ताला दुजोरा दिला. सैय्यद अब्दुल रहीम यांचे नाव लोकांच्या विस्मरणात गेले आहे. निर्मात्यांनी मला या महान खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी दिली, त्याचा मला आनंद आहे, असे किर्तीने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती या चित्रपटात अजयच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.


मध्यंतरी, किर्तीने एक बॉलिवूड चित्रपट साईन केल्याची चर्चा होती. बोनी कपूर निर्मित हा चित्रपट‘बधाई हो’चे दिग्दर्शक अमित शहा दिग्दर्शित करणार असे म्हटले गेले होते. पण हा चित्रपट फायनल होण्याआधीच अजयच्या बायोपिकमध्ये किर्तीची वर्णी लागली.


किर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले. २०१३ मध्ये ‘गीतांजली’ या मल्याळम चित्रपटातून तिने लीड अभिनेत्री म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु केली. २०१४ मध्ये तिने अनेक तामिळ चित्रपटांच्या आॅफर स्वीकारल्या. किर्ती अलीकडे ‘सरकार’ या साऊथच्या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय लीड रोलमध्ये होता.

Web Title: keerthy suresh to make her bollywood debut with ajay devgns sports drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.