कार्तिक आर्यनसारा अली खान लवकरच 'लव आज कल' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच हे दोघे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपू्र्वी 'लव आज कल २' सिनेमाच्या सेटवरील फोटो समोर आले होते. या फोटोतून सारा अली खानकार्तिक आर्यन यांची केमिस्ट्री पहायला मिळाली. नुकताच कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ समोर आहे. या व्हिडिओत कार्तिक नव्या अंदाजात दिसतो आहे.

सिंपल लूक आणि फ्रेंच दाढीमध्ये कार्तिक दिसतो आहे. त्याचा हा लूक 'लव आज कल २'चा असल्याचे बोलले जात आहे.

इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल' चित्रपटात दीपिका पादुकोण व सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. दहा वर्षानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येत असून यात सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा आली खान व कार्तिक आर्यन झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिल्लीतील शूट पूर्ण झाले असून पुढील शेड्युलसाठी ते उदयपूरला पोहचले आहेत. 


बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत पहिल्यांदाच कार्तिक काम करत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत चित्रीकरणादरम्यान कार्तिक साधारण अंदाजात पहायला मिळाला. मात्र आता कार्तिक फ्रेंच दाढी लूकमध्ये पहायला मिळाला. हा लूक त्याला चांगला वाटतो आहे. चित्रपटात वेेगवेगळे ट्विस्ट व टर्न असल्यामुळे कार्तिकमध्ये फिजिकली देखील बदल पहायला मिळेल.

'लव आज कल २' व्यतिरिक्त कार्तिक आर्यन पति पत्नी और वो चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत भूमी पेडणेकर व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


Web Title: Kartik Aryan's new look, viral video on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.