kalank actress alia bhatt signed s s rajamoulis rrr | कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!!
कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!!

ठळक मुद्दे ‘बाहुबली’नंतर राजमौलींचा ‘आर आर आर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत.

आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज करणारी आलिया भट्ट आता साऊथच्या वाटेवर निघालीय. ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. होय, ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आर आर आर’ या आगामी चित्रपटात आलिया भट्टची एन्ट्री झालीय.
अनेकांचा या बातमीवर विश्वास बसणार नाही. कारण, काल-परवापर्यंत आलियाने राजमौलींच्या ‘आर आर आर’ची आॅफर नाकारली, अशी बातमी होती. पण आता बातमी एकदम खरी आहे. खुद्द राजमौली यांनीच आलियाच्या एन्ट्रीची अधिकृत घोषणा केलीय.
हैदराबादेत मीडिया टुडेशी बोलताना राजमौलींनी ही घोषणा केली. ‘आर आर आर’ आम्ही आलियाला साईन केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत आम्ही आलियाला भेटलो आणि आपल्या प्रोजेक्टची आॅफर दिली. आलियाला हा प्रोजेक्ट आवडला आणि तिने यात काम करण्यास होकार दिला. आलिया भट्ट या चित्रपटात रामचरणच्या अपोझिट दिसेल. आलिया आमच्या चित्रपटात काम करणार, याचा आम्हाला आनंद आहे, असे राजमौलींनी सांगितले. ‘आर आर आर’च्या टिष्ट्वटरवरच्या आॅफिशिअल पेजवरही याची घोषणा करण्यात आली आहे.
‘बाहुबली’ सीरिजनंतर ‘आर आर आर’ हा राजमौलींचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे चाहते हा चित्रपट पाहण्यास उत्सूक आहेत. दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे. ‘बाहुबली’सीरिजनंतर तर राजमौलींची ख्याती जगभर पसरली. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली. ‘बाहुबली’नंतर राजमौलींचा ‘आर आर आर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत.

English summary :
Alia Bhatt has been signed in Director S. S. Rajamouli 's 'RRR'. The Rajamouli announced this while talking to media today at Hyderbad.


Web Title: kalank actress alia bhatt signed s s rajamoulis rrr
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.