Kajol husband Ajay Devgn tells 'O' Secret; Wondering to know what you think! | काजोलने पती अजय देवगणचे सांगितले ‘हे’ सीक्रेट; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

अभिनेत्री काजोलने पती अजय देवगणबद्दल नुकताच एक खुलासा केला. तिने म्हटले की, अजयला मुलांचा सांभाळ करणे माझ्यापेक्षाही चांगले जमते. मुंबईमध्ये ‘द इन्क्रेडिबल्स-२’च्या हिंदी व्हर्जनच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी तिने हा खुलासा केला. चित्रपट आणि संसारात व्यस्त राहणाºया काजोलला याविषयी प्रश्न विचारला असता तिने म्हटले की, ‘मला असे वाटते की, मुलांचा सांभाळ करण्यास त्याना योग्य ममत्व देण्यास माझ्यापेक्षाही अजयला चांगले जमते.’ पुढे बोलताना काजोलने म्हटले की, ‘मीदेखील मुलांचा सांभाळ करते, त्यांना जीव लावते मात्र एका मर्यादेपर्यंतच. मी नियम आणि नियमित गोष्टींचे खूपच काटेकोरपणे पालन करते; परंतु अजय असा अजिबातच नाही.’ 

काजोलने ‘द इन्क्रेडिबल्स-२’ला आपला आवाज दिला आहे. काजोलने या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, ‘हा चित्रपट तुमच्या-आमच्या परिवाराप्रमाणेच आहे. चित्रपटाची कथा एका परिवारावर आधारित आहे. या चित्रपटाचे हिंदी डबिंग करताना बरेचसे असे क्षण आले, ज्यामध्ये मी स्वत:ला चित्रपटाच्या पात्राबरोबर समरस झाल्याचे अनुभवले. त्यामुळे या चित्रपटाचा भाग बनल्याने मी खूपच उत्साहित आहे.  हा चित्रपट २२ जून रोजी हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा एक व्हिडीओदेखील यू-ट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये काजोल दिसत आहे. काजोलने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मिळालेल्या यशाबद्दल सांगितले की, ‘मला खरोखरच माहिती नाही की, हे काय आहे. माझे संपूर्ण आयुष्य अविश्वसनीय राहिले आहे. मला माझ्या आयुष्यावर खूप प्रेम आहे. कारण ते घडविण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. कदाचित त्यामुळेच मला माझे आयुष्य अविश्वसनीय वाटत असावे.’

काजोल लवकरच पती अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत बनविल्या जाणाºया ‘एला’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. प्रदीप सरकार यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आनंद गांधी यांच्या ‘बेटा कागोदो’ या गुजराती नाटकावर आधारित आहे. चित्रपटात काजोल सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा आई-मुलाच्या अवतीभोवती फिरणारी आहे. 
Web Title: Kajol husband Ajay Devgn tells 'O' Secret; Wondering to know what you think!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.