Troll : शॉर्ट ड्रेसमुळे जान्हवी कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:00 IST2018-09-14T13:32:29+5:302018-09-17T08:00:00+5:30

जान्हवी कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.तर दुसरीकडे हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

Jahnavi kapoor Trolled On Her Short Pink Dress | Troll : शॉर्ट ड्रेसमुळे जान्हवी कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’

Troll : शॉर्ट ड्रेसमुळे जान्हवी कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’

जान्हवी कपूर 'धडक' सिनेमामुळे खूप चर्चेत होती. तिच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असायचे. आता धडक नंतर जान्हवी कोणत्या सिनेमात झळकणार? सध्या ती काय करते? अशा अनेक गोष्टींवरही चर्चा रंगत असते. अनेकदा सेलिब्रेटी त्यांच्या चांगल्या ड्रेसिंग सेन्समुळे किंवा विचित्र ड्रेसिंग सेन्समुळेही नेटीझन्सचे लक्ष वेधत असतात. आता यात जान्हवी कपूरच्याही नावाची भर पडली आहे. 

होय,जान्हवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत गुलाबी रंगाचे फक्त टी-शर्टच परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.जान्हवीचा हा फोटो पाहून युजर्सही संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून अनेकजण भन्नाट कमेंट देताना दिसत आहेत. त्यात एका युजरने म्हटले आहे की, जान्हवी खाली पॅन्ट घालायला विसरली की काय? तर दुस-या एका युजरने म्हटले आहे की, जान्हवीची ड्रेसिंग स्टाइल खूपच भन्नाट आहे. जान्हवीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. 

दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची चांदनी असणाऱ्या श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच श्रीदेवी यांच्या गाजलेल्या अनेक सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'सदमा' सिनेमाचा रिमेक व्हावा आणि त्यात श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका साकारायला आवडेल अशी प्रतिक्रिया जान्हवीने दिली आहे. सदमा सिनेमातील श्रीदेवी यांनी साकारलेली नेहलता आणि कमल हासनचा सोमू रसिकांना भावला होता. त्यामुळेच सदमा सिनेमातील श्रीदेवी यांच्या आव्हानात्मक भूमिका साकारत आईच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं जान्हवीचं स्वप्न आहे. 

Web Title: Jahnavi kapoor Trolled On Her Short Pink Dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.