कन्फर्म ! सुश्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत राहते लिव्ह-इनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:16 PM2019-04-24T12:16:00+5:302019-04-24T12:41:33+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन सुश्मिता सेन जास्त चर्चेत आहे. सध्या सुश्मिता मॉडल रोहमन शॉलला डेट करते आहे.

Its confirmed Shushmita sen is in live in reletionship with her boyfriend rohaman Shawl | कन्फर्म ! सुश्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत राहते लिव्ह-इनमध्ये

कन्फर्म ! सुश्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत राहते लिव्ह-इनमध्ये

ठळक मुद्दे एका फॅशन इव्हेंटमध्ये दरम्यान सुश्मिता आणि रोहमनची भेट झालीयानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम

गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन सुश्मिता सेन जास्त चर्चेत आहे. सध्या सुश्मिता मॉडल रोहमन शॉलला डेट करते आहे. रोहमनसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सुश्मिताच्या एकंदरीत वागण्यावरुन ती या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत असल्याचा अंदाज येतोय.


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, रोहमन आता सुश्मिताच्या घरी शिफ्ट झाला आहे. रिपोर्टनुसार रोहमन रोज सुश्मिताच्या बांद्रातल्या घरी येत होता. सुश्मिताच्या दोनही मुलांशी तो चांगलाच जेल झाला आहे. त्यामुळे आता दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


रोहमनच्या आधी सुश्मिता रितिक भसीनला डेट करत होती. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर एका फॅशन इव्हेंटमध्ये दरम्यान सुश्मिता आणि रोहमनची भेट झाली. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. रोहमनने सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर नव्या वर्षांत दोघेही लग्न करू शकतात. हेच कारण आहे की, अलीकडे सुश व रोहमन दोघेही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. सुश्मिता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण रोमान्स आणि लूक्सच्या बातम्यांमुळे ती कायम चर्चेत असते.

Web Title: Its confirmed Shushmita sen is in live in reletionship with her boyfriend rohaman Shawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.