दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांना सोनाक्षी सिन्हामुळे खावा लागला ‘मार’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:19 PM2018-08-16T13:19:51+5:302018-08-16T13:28:03+5:30

रिअल लोकेशन्सवर शूटींग करताना बॉलिवूड सेलिब्रेटींसह सगळ्यात टीमच्याच नाकीनऊ येते. अशाठिकाणी गर्दीलाला तोंड देणे सोपे नसते. असेचं काहीसे झाले, ‘हॅपी फिर भाग जाएगी’च्या शूटींगवेळी. 

Happy Phirr Bhag Jayegi director Mudassar Aziz got hit because of Sonakshi Sinha | दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांना सोनाक्षी सिन्हामुळे खावा लागला ‘मार’!!

दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांना सोनाक्षी सिन्हामुळे खावा लागला ‘मार’!!

googlenewsNext

रिअल लोकेशन्सवर शूटींग करताना बॉलिवूड सेलिब्रेटींसह सगळ्यात टीमच्याच नाकीनऊ येते. अशाठिकाणी गर्दीलाला तोंड देणे सोपे नसते. असेचं काहीसे झाले, ‘हॅपी फिर भाग जाएगी’च्या शूटींगवेळी. ‘हॅपी फिर भाग जाएगी’चे दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांना रिअल लोकेशनवरचे शूटींग चांगलेच महागात पडले. होय, अमृतसरच्या एका मार्केटमधील रस्त्यावर हे शूट होणार होते. युनिटने सगळे सोपस्कार पूर्ण केले. शूटींगची तयारीही झाली. पण तोपर्यंत रस्त्यांवर लोकांची इतकी गर्दी जमली की, सगळ्यांनाच टेन्शन आले. सोनाक्षी येणार म्हटल्यावर लोकांचा उत्साह अधिकचं वाढला. शॉट रेडी होताच, सोनाक्षी शूटींगस्थळी आली आणि लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, गर्दीला आवरणे अशक्य झाले. मग काय, इतक्या गर्दीत शूटींग शक्य नाही, हे अजीज यांनी हेरले आणि त्यांनी लगेच बॉऊन्सरच्या पहाऱ्यात सोनाक्षीला तिच्या कारमध्ये बसवून परत पाठवले. पण अजीज यांनी सोनाक्षीला परत पाठवून दिल्याचे बघून लोक भलतेचं चिडले. एक व्यक्ति इतका संतापला की, त्याने आपल्या अजीज यांच्या पाठीवर  हाताच्या ढोपराने हल्ला केला. या हल्ल्यानंतर अजीज यांच्या पाठीत तीव्र वेदना उठल्या. तो अख्खा दिवस अजीज यांना वेदनेने विव्हळत काढावा लागला.


अजीज यांना जेव्हा-केव्हा सोनाक्षी भेटते, तेव्हा या घटनेवरून तिला चिडवण्याची संधी ते सोडत नाहीत. तुझ्यामुळे मला मार खावा लागला, असे म्हणून ते सोनाला डिवचतात. 

 'हॅपी भाग जायेगी' चित्रपटात अभिनेत्री डायना पेंटीने पंजाबी मुलगी हरप्रीत म्हणजे हॅपीची भूमिका केली होती आणि ती लग्नातून पळून जाऊन पाकिस्तानमध्ये पोहचलेली दाखवली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सोनाक्षी हरप्रीतची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ती चीनमध्ये पळून जाताना दिसणार आहे. 'हॅप्पीहॅपी फिर भाग जायेगी' चित्रपट २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Happy Phirr Bhag Jayegi director Mudassar Aziz got hit because of Sonakshi Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.