Any guesses ? आता येणार माधुरी दीक्षित-आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:42 AM2019-02-10T10:42:52+5:302019-02-10T10:44:58+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टारकिड्सच्या डेब्यूचा ‘सिलसिला’ सुरु आहे. दुसरीकडे सुपरहिट चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेंडही जोरात आहे. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

director inder kumar wants to remake aamir khan and madhuri dixit super hit film dil | Any guesses ? आता येणार माधुरी दीक्षित-आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!!

Any guesses ? आता येणार माधुरी दीक्षित-आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!!

googlenewsNext
ठळक मुद्दे १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तरूणाईला वेड लावले होते. या चित्रपटाची गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टारकिड्सच्या डेब्यूचा ‘सिलसिला’ सुरु आहे. दुसरीकडे सुपरहिट चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेंडही जोरात आहे. जान्हवी कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘धडक’ आणि शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ याचे ताजे उदाहरण आहे. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होय, आमिर खान आणि माधुरी दीक्षितच्या एका तुफान गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक येत्या दिवसांत पडद्यावर दिसणार आहे. माधुरी व आमिरचा हा चित्रपट कोणता, हे तुम्ही ओळखल असेलच. होय, या चित्रपटाचे नाव आहे ‘दिल’. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तरूणाईला वेड लावले होते. या चित्रपटाची गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली होती.


दिग्दर्शक इंदर कुमार दीर्घकाळापासून ‘दिल’च्या रिमेकचे प्लानिंग करत होते. आता तर या रिमेकची स्क्रिप्टही तयार आहे. होय, खुद्द इंदर कुमार यांनी ही माहिती दिली. मी खूप दिवसांपासून ‘दिल’चा रिमेक बनवू इच्छित होतो. पण आता आमची स्क्रिप्ट तयार आहे.  ‘दिल अगेन’ असे या रिमेकचे नाव असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या रिमेकमध्ये माधुरी व आमिरलाच घेणार का? असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. नाही, मी या चित्रपटात दोन नवे चेहरे घेणार आहे. पण अद्याप कास्टिंग ठरलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


‘दिल अगेन’ची रिलीज डेट सांगण्यासही त्यांनी नकार दिला. रिलीज डेटबद्दल मी काहीही सांगणार नाही. कारण यामुळे दबाव येतो. सध्या मी ‘टोटल धमाल’च्या पोस्ट प्रॉडक्शन कामात आहे. या नव्या प्रोजेक्टबद्दल तूर्तास मी काहीही सांगू शकत नाही. ‘दिल अगेन’चे शूटींग लवकरच सुरु होईल, एवढेच मी सांगेल, असे ते म्हणाले.

Web Title: director inder kumar wants to remake aamir khan and madhuri dixit super hit film dil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.