​कॉमेडी किंग मेहमूदचा मुलगा लकी अली बॉलिवूडमध्ये फ्लॉप; पण झालीत तीन लग्ने!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:43 AM2017-12-04T10:43:02+5:302017-12-04T16:13:02+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक जण खूप लोकप्रीय झालेत आणि मग अचानक दिसेनासे झालेत. या यादीतले एक नाव म्हणजे, गायक लकी अली. ...

Comedy King Mehmood's son Lucky Ali flopped in Bollywood; But there were three weddings! | ​कॉमेडी किंग मेहमूदचा मुलगा लकी अली बॉलिवूडमध्ये फ्लॉप; पण झालीत तीन लग्ने!

​कॉमेडी किंग मेहमूदचा मुलगा लकी अली बॉलिवूडमध्ये फ्लॉप; पण झालीत तीन लग्ने!

googlenewsNext
लिवूडमध्ये अनेक जण खूप लोकप्रीय झालेत आणि मग अचानक दिसेनासे झालेत. या यादीतले एक नाव म्हणजे, गायक लकी अली. होय, लकी अलीची वेगळी ओळख देण्याचे कारण नाही. कारण लकी हा कॉमेडीचा बादशाह मेहमूदचा मुलगा आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. लकी एक गायक आहे तसाच एक चांगला अभिनेताही आहे. ‘कांटे’ या चित्रपटात त्याचा अभिनय आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्यानंतर लकी इंडस्ट्रीतून जणू गायब झाला. सध्या लकी अली कुठे आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शिवाय आम्हाला अचानक लकी अली आठवण्यामागचे कारण काय? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे.  इतक्या वर्षांनंतर आम्हाला अचानक लकीची आठवण होण्यामागे कारणही तसेच आहे. होय, लकी अलीच्या तिस-या पत्नीचे काही हॉट फोटो आमच्या हाती लागले आहेत.



लकीच्या तिस-या पत्नीचे नाव आहे, आयशा उर्फ केट एलिझाबेथ हलाम. आयशाही लकीपेक्षा तब्बल २४ वर्षांनी लहान आहे. सध्या लकीसोबत ती मुंबईत राहतेय.



सन २०१० मध्ये लकी व आयशा लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा सहा वर्षांचा मुलगाही आहे. मिस ग्रेट ब्रिटन राहून चुकलेली आयशा मुंबईत मॉडेलिंग करते. शिवाय ती गिटार प्लेअरही आहे. आयशाने बेंगळुरूचा एक गिटार बँड ज्वॉईन केला आहे.



हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.   यशाच्या बाबतीत लकी भलेही अपयशी ठरला असेल पण लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली.

Web Title: Comedy King Mehmood's son Lucky Ali flopped in Bollywood; But there were three weddings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.