Birthday Special : कधी रिचर्ड गेअर तर कधी पुजा-यामुळे वादात सापडली शिल्पा शेट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 08:00 AM2019-06-08T08:00:00+5:302019-06-08T08:00:02+5:30

दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज (8 जून) वाढदिवस. चित्रपटांइतकीच शिल्पा वेगवेगळ्या वादांमुळेही चर्चेत राहिली.

Birthday Special: shilpa shettys biggest controversy | Birthday Special : कधी रिचर्ड गेअर तर कधी पुजा-यामुळे वादात सापडली शिल्पा शेट्टी!

Birthday Special : कधी रिचर्ड गेअर तर कधी पुजा-यामुळे वादात सापडली शिल्पा शेट्टी!

googlenewsNext
ठळक मुद्दे२००३ मध्ये शिल्पा व तिच्या कुटुंबावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला होता.

दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज (8 जून) वाढदिवस. 8 जून 1975 मध्ये शिल्पाचा जन्म  झाला होता. ‘बाजीगर’या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली आणि पाठोपाठ जवळपास 40 सिनेमे करत, बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपटांइतकीच शिल्पा वेगवेगळ्या वादांमुळेही चर्चेत राहिली.

 शिल्पाची सर्वात जास्त चर्चा ही अक्षय कुमारच्या रिलेशनशिपमुळे झाली होती. ‘मै खिलाडी तू अनाडी’ या सिनेमाच्या सेटवर अक्षय व शिल्पा यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. ‘धडकन’ मध्ये अक्षय व शिल्पाने एकत्र काम केले. त्यादिवसांत हे दोघेही लग्न करणार, अशी चर्चा सुरु झाली. पण एका मॅगझिनने ही बातमी छापल्यावर शिल्पा इतकी नाराज झाली होती की, तिने या मॅगझिनविरोधात केस ठोकली होती.

२००३ मध्ये शिल्पा व तिच्या कुटुंबावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. अर्थात शिल्पाच्या आईवडिलांनी या आरोपाचा इन्कार केला होता. शिल्पाची प्रतीमा खराब करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

२००६ मध्ये शिल्पावर अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप झाला. मदुराईच्या एका न्यायालयाने शिल्पा शेट्टी व रीमा सेन यांच्याविरोधात अश्लिलतेस चालना देत असल्याच्या आरोपावरून अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. एका तामिळ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शिल्पा बोल्ड अवतारात दिसली होती. कोर्टात शिल्पाने आरोप नाकारले होते.

 हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअरसोबतच्या किसमुळे वादात सापडली होती. 2007 मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात रिचर्डने शिल्पाला स्टेजवर सर्वांसमोर किस केले होते. यावरून चांगले रान माजले होते. या वादावरून शिल्पाला कोर्टात खेचले गेले होते.

मुंबईच्या एका मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिल्पाचा मंदिरातील पुजा-यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरून शिल्पावर प्रचंड टीका झाली होती.

छोट्या पडद्यावरील  सुपर डान्सर २  या रिअ‍ॅलिटी शोमध्ये शिल्पाने वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. या कार्यक्रमात सलमान खान हाही हजर होता. जातिवाचक शब्दांचा वापर केल्याबद्दल वाल्मिकी समाजाने याप्रकरणी शिल्पा व सलमान या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत देशभरात ठिकठिकाणी शिल्पा व सलमानचे पुतळे जाळत आंदोलन उभारले होते. याप्रकरणी शिल्पाला माफी मागावी लागली होती.

Web Title: Birthday Special: shilpa shettys biggest controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.