Bigg Boss12 : ‘बिग बॉस12’चे सगळ्यात महागडे स्पर्धक आहेत अनूप जलोटा! दर आठवड्याला मिळणार इतके लाख!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 19:43 IST2018-09-16T19:42:10+5:302018-09-16T19:43:33+5:30
‘बिग बॉस’चे 12 वे सीझन आजपासून सुरू होतेय. यंदाच्या सीझनमध्ये घरात जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये सगळ्यात मोठे नाव आहे, ते भजनगायक अनूप जलोटा यांचे.

Bigg Boss12 : ‘बिग बॉस12’चे सगळ्यात महागडे स्पर्धक आहेत अनूप जलोटा! दर आठवड्याला मिळणार इतके लाख!!
‘बिग बॉस’चे 12 वे सीझन आजपासून सुरू होतेय. यंदाच्या सीझनमध्ये घरात जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये सगळ्यात मोठे नाव आहे, ते भजनगायक अनूप जलोटा यांचे. होय, अनूप जलोटा ‘बिग बॉस12’च्या घरात जाणारे सर्वाधिक वयोवृद्ध आणि सन्माननीय व्यक्ती असणार आहेत. भजन सम्राट यांना शोमध्ये आणण्याचे एक खास कारण आहे. याचमुळे त्यांच्यावर मोठी रक्कमही खर्च करण्यात आली आहे. होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चे मेकर्स यंदाचे सीझन फॅमिलीसाठी बनवू इच्छितात. त्यामुळे या सीझनमध्ये अनूप जलोटा यांना आणण्याचे प्लॅनिंग केले गेले. साहजिकच यासाठी ‘बिग बॉस’च्या मेकर्सला मोठी रक्कम मोजावी लागली. सूत्रांचे मानाल तर ६५ वर्षांच्या अनूप जलोटा यांना ‘बिग बॉस’च्या घरात राहण्यासाठी दर आठवड्याला ४५ लाख रूपये मिळणार आहेत. अनूप जलोटा यांची प्रेक्षकांच्या मनातील प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. आपल्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये ते वादांपासून चार हात लांब राहिलेत. अशास्थितीत ‘बिग बॉस’च्या घरात अन्य स्पर्धकांशी ते कसे निपटतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
काम कठीण केले पाहिजे. त्यामुळेच मी बिग बॉसच्या घरात जायला तयार झालो. जर चित्रपटातील गाणी गायली असती तर सहज यश मिळवले असते. पण, मी भजन निवडले. भजन क्षेत्रात करियर करणे सोपे नव्हते. मी नेहमीच आव्हानात्मक काम केले आहे. बिग बॉसमध्ये देखील चॅलेंज स्वीकारायला आवडेल. तीन महिने तिथे राहणे कठीण आहे. तिथे मी योगा, व्यायाम व संगीतचा रियाज करेन, असे अलीकडे अनूप जलोटा म्हणाले होते.