Omg: लग्नाआधीच अर्जुनला साकारायचीय वडिलांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 12:19 PM2019-04-03T12:19:13+5:302019-04-03T12:21:10+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. नुकतेच अर्जुन मलायका सोबत मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करुन आला आहे.

Arjun kapoor want to play a father on screen in age 33 plus | Omg: लग्नाआधीच अर्जुनला साकारायचीय वडिलांची भूमिका

Omg: लग्नाआधीच अर्जुनला साकारायचीय वडिलांची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्दे अर्जुनला इन्टेंस सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहेअर्जुन लवकरच आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपतमध्ये दिसणार आहे

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. नुकतेच अर्जुन मलायका सोबत मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करुन आला आहे. अर्जुन गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. 19 एप्रिलला दोघे ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचे कळतेय. याबाबत अर्जुन किंवा मलायकाने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अर्जुनला  इन्टेंस सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्याला पडद्यावर ठग, गँगस्टर आणि वडिलांची भूमिका साकारायची आहे. 


एका मुलाखती दरम्यान अर्जुन म्हणाला की, ''मला आता इन्टेंस सिमेमांमध्ये काम करायचे आहे. मला ठग, गँगस्टर आणि वडील अशा विविध प्रकाराच्या भूमिका साकारायच्या आहेत.'' अर्जुन लवकरच आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपतमध्ये दिसणार आहे.


सध्या अर्जुन आणि मलायकाची लग्नीसराई सुरु आहे. लग्नात दोघांचे जवळचे मित्रमैत्रीण या लग्नाला उपस्थित राहाणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत करिना कपूर खान, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच त्या दोघांनाही ही गोष्ट मीडियापर्यंत येऊ द्यायचे नाहीये असे ठरवले आहे आणि त्यामुळे त्यांचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांनी लग्नाच्या तयारीबद्दल कोणालाही सांगायचे नाही अशी ताकीद त्यांना देण्यात आली असल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे.

Web Title: Arjun kapoor want to play a father on screen in age 33 plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.