एकटी नाही तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह व्हॅकेशन एन्जॉय करत होती मलायका, या गोष्टीमुळे झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 10:53 AM2019-04-03T10:53:45+5:302019-04-03T10:56:51+5:30

अर्जुननेही त्याच्या मालदीव्हज व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Arjun Kapoor shares pictures from his vacation in the Maldives; fans ask where is Malaika Arora in comments | एकटी नाही तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह व्हॅकेशन एन्जॉय करत होती मलायका, या गोष्टीमुळे झाला खुलासा

एकटी नाही तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह व्हॅकेशन एन्जॉय करत होती मलायका, या गोष्टीमुळे झाला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. अशाच यादीतील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. सध्या मलायका मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोशल मीडियावर मलायकाचे व्हॅकेशनवरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मलायकाचे अंदाज खूपच बोल्ड आणि ग्मलॅरस पाहायला मिळतोय. मालदीव्हज व्हॅकेशनचे आतापर्यंत फक्त मलायकाचेच फोटो पाहायला मिळाले होते. मात्र तिथे तिच्यासोबत अर्जुन कपूरही होता. अर्जुननेही त्याच्या मालदीव्हज व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

त्यामुळे मलायका आणि अर्जुन हे दोघेही एकत्र त्यांचा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे उघड झाले आहे. ब-याचदा एअरपोर्टवर बाहेर पडताना दोघेही वेगवेगळ्या मार्गाने एकत्र बाहेर पडतात. मीडियाचे कॅमरा दिसताच  त्यांची गोंधळलेली अवस्था मात्र मीडियाच्या कॅमे-यात कॅप्चर होतेच. त्यामुळे या लव्हबर्डने कितीही त्यांचे नाते जगापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे बाहेर येतेच. 

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.  


 

Web Title: Arjun Kapoor shares pictures from his vacation in the Maldives; fans ask where is Malaika Arora in comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.