India’s Got Talent 8च्या सेटवर हातात हात घालून दिसले मलायका अरोरा-अर्जुन कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:07 PM2018-10-22T12:07:08+5:302018-10-22T12:09:16+5:30

इंडियाज गॉट टॅलेन्टच्या ८ व्या सीझनच्या प्रीमीअरदरम्यानही अर्जुन व मलायका एकत्र दिसले आणि त्यांच्या रोमान्सच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला.

Arjun Kapoor & Malaika Arora walk hand in hand on India’s Got Talent Season 8 Premiere | India’s Got Talent 8च्या सेटवर हातात हात घालून दिसले मलायका अरोरा-अर्जुन कपूर!

India’s Got Talent 8च्या सेटवर हातात हात घालून दिसले मलायका अरोरा-अर्जुन कपूर!

googlenewsNext

बॉलिवूडचे कथित कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अलीकडे एका गाडीत दिसले होते. त्यापूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्ये मलायका व अर्जुन एकत्र दिसले होते. या शोदरम्यान मलायका व अर्जुन एकमेकांच्या आजु-बाजूला बसलेले दिसल होते. खरे तर मलायका व अरबाज खान यांचा घटस्फोट होण्याआधीपासून मलायका व अर्जुनच्या कथित अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. मलायका व अर्जुनची वाढती जवळीक या घटस्फोटाला कारणीभूत ठरली, अशीच त्यावेळी चर्चा होती. ही बातमी सगळ्यांसाठीच शॉकिंग होती. कारण अर्जुन कपूरचे कुटुंब आणि सलमानचे कुटुंब यांच्यात घनिष्ट संबंध होते. शिवाय अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता हिला अनेक वर्ष डेट करत होता. अर्थात अर्जुन वा मलायका अद्यापही यावर काहीही बोलले नाहीत. पण  लॅक्मे फॅशन वीक2018 दरम्यान मलायका व अर्जुन पुन्हा एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा नव्याने चर्चेला सुरूवात झाली. यानंतर मलायका व अर्जुन बिनधास्त एकत्र फिरताना दिसताहेत. काल इंडियाज गॉट टॅलेन्टच्या ८ व्या सीझनच्या प्रीमीअरदरम्यानही अर्जुन व मलायका एकत्र दिसले आणि त्यांच्या रोमान्सच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला.


मलायका ही इंडियाज गॉट टॅलेन्टच्या ८ व्या सीझनची जज आहे. करण जोहर, किरण खेरसोबत ती हा शो जज करत आहे. याच शोच्या पहिल्या भागात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा या दोघांनी  नमस्ते इंग्लंड  या चित्रपटाचे प्रमोशन केले. शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचलेल्या अर्जुनने नेमकी मलायकाच्या बाजूचीच सीट पटकावली. यावेळी दोघेही सेल्फी काढताना दिसले. केवळ इतकेच नाही तर मलायका व अर्जुन दोघांनीही शोच्या स्टेजवर एकत्र डान्सही केला. मलायकाचा हात पकडून अर्जुनने तिला स्टेजवर नेले. यादरम्यान दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी होती.

Web Title: Arjun Kapoor & Malaika Arora walk hand in hand on India’s Got Talent Season 8 Premiere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.