anushka sharma gets a talking statue at madame tussauds singapore | अनुष्का शर्मा मादाम तुसाँमधील मेणाचा पुतळा मारणार चाहत्यांसोबत गप्पा!
अनुष्का शर्मा मादाम तुसाँमधील मेणाचा पुतळा मारणार चाहत्यांसोबत गप्पा!

अभिनेत्री अनुष्का शर्मा आता ओप्रा विन्फ्रे, क्रिस्टियानो रोनाल्डो, लुईसा हॅमिल्टन यासारख्या सेलिब्रिटींच्या रांगेत जावून बसली आहे. होय, सिंगापूरमधील मादाम तुसाँ या जगभरात प्रसिद्ध असलेल्या संग्रहालयात अनुष्का शर्माचा मेण्याचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पण हा मेणाचा पुतळा या संग्रहालयातील अन्य पुतळ्यांपेक्षा वेगळा असणार आहे. होय, अनुष्काचा हा पुतळा चाहत्यांशी बोलूही शकणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. कारण तिचा हा पुतळा बोलका पुतळा असणार आहे. मादाम तुसाँ संग्रहालयात अशा प्रकारचा बोलका पुतळा असणारी अनुष्का ही भारतातील पहिली सेलिब्रिटी आहे.
या संग्रहालयात काही मोजक्याच लोकांच्या पुतळ्यावर इंटरॅक्टिव्ह फीचरचा प्रयोग केला जातो. यापूर्वी फुटबॉलपटू रोनाल्डो, ओप्रा विन्फ्रे आणि लुईस हॅमिल्टन यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या पुतळ्यांवर इंटरॅक्टिव्ह फीचरचा प्रयोग करण्यात आला होता.  अनुष्काच्या या पुतळ्याच्या हातात फोन असणार आहे.  हा फोन उचलला जाणार तेव्हा तिचा आवाज ऐकू येणार आहे. अनुष्काच्या या पुतळ्यासोबत चाहते सेल्फीसुद्धा काढू शकणार आहेत. साहजिकच अनुष्कासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे. अनुष्का व तिचा पती विराट कोहली हे दोघेही यामुळे जाम आनंदात आहेत, हे सांगणे नकोच.


Web Title: anushka sharma gets a talking statue at madame tussauds singapore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.