आणि अशी सुरू झाली प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्ह स्टोरी... प्रियांकाने घेतला लग्न निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:10 AM2018-10-31T11:10:48+5:302018-10-31T11:13:31+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र निक आणि प्रियांकाची लव्ह स्टोरी खूप कमी जणांना माहिती आहे.

And it started with Priyanka Chopra and Nick Jonas's Love Story ... Priyanka took the wedding decision | आणि अशी सुरू झाली प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्ह स्टोरी... प्रियांकाने घेतला लग्न निर्णय

आणि अशी सुरू झाली प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्ह स्टोरी... प्रियांकाने घेतला लग्न निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देनिकची ओळख 2017ला मेट गालामध्ये झालीया नात्याची सुरुवात प्रियांका नाही तर निककडून झाली होती

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र निक आणि प्रियांकाची लव्ह स्टोरी खूप कमी जणांना माहिती आहे. लोकांना फक्त ऐवढेच माहिती आहे की प्रियांका आणि निकची ओळख 2017ला मेट गालामध्ये झाली. त्यानंतर दोघे व्हेकेशन एन्जॉय करण्यापासून सर्वाजनिक ठिकाणी एकत्र फिरायला लागले. तुम्हाला हे माहिती आहे का? या नात्याची सुरुवात प्रियांका नाही तर निककडून झाली होती. होय, तुम्ही बरोबर वाचलात निकने प्रियांकाला पाहिला मेसेज केला होता. एका इंटरव्हु दरम्यान प्रियांकाने हा स्वत: खुलासा केला.  

निकने प्रियांकाला मेसेज केला होता ज्यात लिहिले होते की, 'आई थिंक वी शुड कनेक्ट' (मला वाटतेय आपल्या एकमेकांशी बोलत राहायला हव आणि भेटायला हवे ) आणि अशा प्रकारे प्रियांका आणि निकचे बोलणे सुरु झाले.  सध्या निक आणि प्रियांकाच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोघांनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे..प्रियांका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. प्रियांका आणि निकचे लग्न 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर चालणार आहे. दोघे जोधपूरच्या उमेद पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहे.

Web Title: And it started with Priyanka Chopra and Nick Jonas's Love Story ... Priyanka took the wedding decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.