32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...! अमिताभ यांनी शेअर केली कविता, कवीने मागितले 32 रूपये!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 11:23 AM2019-06-24T11:23:57+5:302019-06-24T11:24:46+5:30

नुकतीच अमिताभ यांनी एक कविता शेअर केली. पण हे काय? अमिताभ यांनी शेअर केलेली ही कविता आपली आहे, असा दावा एका कवीने केला. केवळ इतकेच नाही तर यापोटी अमिताभ यांच्याकडे ३२ रूपयांची मागणी केली.

amitabh bachchan tweet prabudha saurabhs post writer wants claim | 32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...! अमिताभ यांनी शेअर केली कविता, कवीने मागितले 32 रूपये!!

32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...! अमिताभ यांनी शेअर केली कविता, कवीने मागितले 32 रूपये!!

ठळक मुद्देअमिताभ यांनी ही कविता पोस्ट करताच, कवी प्रबुद्ध सौरभ यांनी स्क्रीनशॉट शेअर करत ही कविता त्यांची असल्याचा दावा केला.

महानायक अमिताभ बच्चन या वयातही प्रचंड बिझी आहे. एकापाठोपाठ एक सिनेमे, शूटींग, प्रवास असा सगळा व्याप असूनही अमिताभ सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात. स्वत:चे जुने फोटो, कविता, विनोद असे सगळे ते सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच अमिताभ यांनी एक कविता शेअर केली. पण हे काय? अमिताभ यांनी शेअर केलेली ही कविता आपली आहे, असा दावा एका कवीने केला. केवळ इतकेच नाही तर यापोटी अमिताभ यांच्याकडे ३२ रूपयांच्या मोबदल्याची मागणी केली.
अमिताभ यांनी  ट्विटरवर हिंदी भाषेवर कविता पोस्ट केली.




 हिन्दी नायाब है
छू लो तो-चरण 
अड़ा दो तो-टांग
धँस जाए तो-पैर
आगे बढ़ाना हो तो-कदम
राह में चिह्न छोड़े तो-पद
प्रभु के हों तो-पाद
बाप की हो तो-लात
गधे की पड़े तो-दुलत्ती
घुंघरू बाँध दो तो-पग
खाने के लिए-टंगड़ी
खेलने के लिए-लंगड़ी

अंग्रेजी में सिर्फ़-LEG
प्रणाम Ef~Ns



 

अमिताभ यांनी ही कविता पोस्ट करताच, कवी प्रबुद्ध सौरभ यांनी स्क्रीनशॉट शेअर करत ही कविता त्यांची असल्याचा दावा केला. शिवाय काहीशा मजेशीर अंदाजात, ‘32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...’ असे लिहिले. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी बिग बींसोबत कुमार विश्वास यांनाही टॅग केले.
कुमार विश्वास यांना टॅग करायचे कारण म्हणजे, 2017 मध्ये कुमार विश्वास यांनी अमिताभ यांचे पिताश्री हरिवंश राय बच्चन यांची एक कविता गायली होती. तसेच त्याचा व्हिडीओ यु-ट्यूबवर अपलोड केला होता. कुमार विश्वास यांनी ही कविता शेअर करताना हरिवंश राय बच्चन यांना क्रेडिटही दिले होते. मात्र याऊपर आपल्या पित्याच्या कवितेचा वापर करून कुमार विश्वास यांनी कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा अमिताभ यांनी केला होता. शिवाय कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठववलीहोती.  कुमार विश्वास यांनी यासाठी माफी मागवी, संबंधित पोस्ट त्वरित डिलीट करावी आणि यातून कमावलेला पैसा परत करावा,अशी मागणी अमिताभ यांनी केली होती. यानंतर कुमार विश्वास यांनी अमिताभ यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली होती. ‘सर्वांकडून माझी प्रशंसा झाली. पण तुमच्याकडून मला कायदेशीर नोटीस मिळाले. बाबूजींचा श्रद्धांजली व्हिडीओ डिलीट करतोय आणि सोबतच तुम्ही मागितल्यानुसार, यातून कमावलेले 32 रूपये परत करतोय,’ असे कुमार यांनी लिहिले होते. अर्थात आता हा वाद निवळला आहे.

Web Title: amitabh bachchan tweet prabudha saurabhs post writer wants claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.