‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 03:08 PM2019-01-20T15:08:31+5:302019-01-20T15:09:44+5:30

आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कलंक’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या ‘wraps up’ पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.

alia bhatt wraps up film kalank shoot see pics and videos | ‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे.

आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कलंक’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या ‘wraps up’ पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.


होय, ‘कलंक’चे शूटींग संपले आणि यानंतर संपूण टीमने पार्टी साजरी केली. आलियाने स्वत: एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. या फोटोत आलियासोबत आदित्य राय कपूरही दिसतोय. ‘कलंकचे शूटींग संपले पण मन अजूनही भरलेले नाही. जे हे समजू शकतात आणि जे समजू शकत नाही, त्यांच्यासाठी... जेव्हा तुम्ही एका चित्रपटाचे शूटींग संपवता त्याक्षणी असे वाटते, जणू तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक भाग दिलाय. विशेषत: तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे मित्र व कुटुंबासोबत काम करतो. हा प्रवास आनंददायी आहे....,’असे आलियाने लिहिले आहे.






‘कलंक’ चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. अखेर आता हा चित्रपट बनत असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि वरूणने याआधी ‘स्टूडंट आॅफ द ईअर’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘हंम्टी शर्मा की दुल्हनिया’सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.  

Web Title: alia bhatt wraps up film kalank shoot see pics and videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.