आलिया भट्ट स्वीकारणार का संजय लीला भन्साळींची ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:23 AM2019-03-12T11:23:47+5:302019-03-12T11:25:09+5:30

बॉलिवूडचे करण-अर्जुन अर्थात शाहरूख खान व सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण बातमी केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी त्यापुढची आहे. होय, भन्साळींच्या या चित्रपटात केवळ शाहरुख-सलमानच नाही तर आलिया भट्टही दिसू शकते.

alia bhatt in sanjay leela bhansalis film with salman khan and shah rukh khan |  आलिया भट्ट स्वीकारणार का संजय लीला भन्साळींची ऑफर?

 आलिया भट्ट स्वीकारणार का संजय लीला भन्साळींची ऑफर?

googlenewsNext
ठळक मुद्दे संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट २०२० च्या ईदमध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   त्यांच्या या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूडचे करण-अर्जुन अर्थात शाहरूख खान व सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण बातमी केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी त्यापुढची आहे. होय, भन्साळींच्या या चित्रपटात केवळ शाहरुख-सलमानच नाही तर आलिया भट्टही दिसू शकते.
सूत्रांचे खरे मानाल तर या लव्ह स्टोरी ड्रामासाठी मेकर्सनी आलियाशी संपर्क साधला आहे. अद्याप आलियाने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. पण आलियाने या चित्रपटासाठी होकार द्यावा, यासाठी मेकर्सनी तिची बरीच मनधरणी चालवल्याचे कळतेय.

आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘राजी’, ‘गली बॉय’ या दोन्ही  चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर १०० कोटींची कमाई केली. साहजिकच, आलियाचा दमदार अभिनय बघता, तिच्याकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या आहेत. ‘बाहुबली’ सीरिजचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली हेही आलियाला आपल्या चित्रपटासाठी साईन करू इच्छित होते. पण तारखा नसल्याने आलियाने म्हणे हा चित्रपट नाकारला. तूर्तास आलिया अनेक बिग बजेट चित्रपटांत बिझी आहे. ‘कलंक’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘तख्त’ अशा मोठ्या चित्रपटांत ती दिसणार आहे. साहजिकचं आलिया प्रचंड व्यग्र आहे. अशात भन्साळींचा चित्रपट ती स्वीकारणार का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

सलमानने भन्साळींच्या खामोशी, हम दिल दे चुके सनम आणि  सावरियां या चित्रपटांत काम केले आहे तर शाहरुखने त्यांच्या  देवदासमध्ये अभिनय केला आहे. त्यामुळे सलमान आणि शाहरुख या दोघांचेही भन्साळी यांच्यासोबत खूपच चांगले संबंध आहेत.  संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट २०२० च्या ईदमध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   त्यांच्या या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: alia bhatt in sanjay leela bhansalis film with salman khan and shah rukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.