ajay devgn to produce a tv show for his sister in law tanisha mukherjee |  जीजू असावा तर असा! तनीषा मुखर्जीसाठी अजय देवगण करणार ‘हे’ काम!!
 जीजू असावा तर असा! तनीषा मुखर्जीसाठी अजय देवगण करणार ‘हे’ काम!!

ठळक मुद्दे‘बिग बॉस’च्या ७ व्या सीझनमध्ये तनीषा दिसली होती. यादरम्यान मी अभिनेता अरमान कोहलीच्या जवळ आली होती. पण ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच, दोघेही आपसी सहमतीने वेगळे झाले होते.

काजोल हे इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. दोन मुलांची आई झाल्यावरही काजोल इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. चित्रपट करत आहे. आजही तिची क्रेज जराही कमी झालेली नाही. याऊलट काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिला इतक्या वर्षांनंतरही इंडस्ट्रीत जम बसवता आला नाही. बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट करूनही तिला यश मिळाले नाही. चित्रपटांत डाळ शिजत नाही, म्हणून तनीषाने टीव्हीकडे मोर्चा वळवला.

‘बिग बॉस’सारखे रिअ‍ॅलिटी शो करून बघितले. पण या शोनेही तनीषाला फार काही मिळाले नाही. ना नव्या आॅफर, ना लोकप्रीयता. अशात तनीषाच्या करिअरबद्दल चिंता साहजिक आहे. आता तर काजोल आणि तनीषाचा जीजू अजय देवगण यांनाही तनीषाच्या करिअरची चिंता सतावू लागली आहे. कदाचित म्हणूनचं जीजूने साळीसाठी हातपाय हलवणे सुरू केले आहे. होय, ताजी खबर खरी मानाल तर अजय देवगण खास आपल्या साळीसाठी एक टीव्ही शो प्रोड्यूस करतोय. या शोमध्ये तनीषा मुख्य भूमिकेत दिसेल. एकंदर काय तर हा तनीषाचा कमबॅक प्रोजेक्ट असले.  


आता फक्त या टीव्ही शोला कसा रिस्पॉन्स मिळतो, अजय देवगण या नावाचा तनीषा मुखर्जीला किती फायदा होतो, तेच पाहायचेय.
‘बिग बॉस’च्या ७ व्या सीझनमध्ये तनीषा दिसली होती. यादरम्यान मी अभिनेता अरमान कोहलीच्या जवळ आली होती. पण ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच, दोघेही आपसी सहमतीने वेगळे झाले होते. तनीषाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. तुम मिलो तो सही, अंतर, पॉपकॉन खाओ, टू वन थ्री, बी केअरफुल अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.  हिंदीशिवाय मराठी, तामिळ व तेलगू चित्रपटांतही ती दिसली.  

English summary :
Ajay Devgan is especially producing a TV show for his sister in law tanisha mukharjee. In this show Tanisha will appear in the main role. This will be comeback project for tanisha.


Web Title: ajay devgn to produce a tv show for his sister in law tanisha mukherjee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.