माजी विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचे सिनेमे भलेही बॉक्स ऑफिसवर कमाल करत नसले, तरी फॅशन फ्रन्टवर मात्र ती अॅक्टिव असते. ऐश्वर्या आपल्या खास स्टाइलसाठी आणि फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. त्यानुसार ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

सब्यसाची ने डिझाइन केली साडी

View this post on Instagram

गेल्या काही दिवसांपूर्वी दोहामध्ये मनिष मल्होत्राच्या शोसाठी ऐश्वर्या शो स्टॉपर होती. नुकताच फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या लिमिटेड एडिशन मेकअप-लाइन लॉन्चवेळी ऐश्वर्या आली होती. यावेळी ती फारच सुंदर दिसत होती. 

साडी लूकमध्ये दिसली विश्वसुंदरी

View this post on Instagram

ऐश्वर्याने ब्लॅक अॅन्ड वाईट रंगाची हॅंड प्रिंटेड जॉर्जेट साडी आणि त्यासोबत ब्लॅक रंगाची क्विलटेड सिल्क ब्लाउज परिधान केलं होतं. हे सब्यसाचीने डिझाईन केलं होतं. या साडीमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसत आहे. तिचं मेकअप, ब्लड रेड लिपस्टिक आणि मोकळे केस सर्वकाही साडीला मॅचिंग आणि एकदम परफेक्ट दिसत आहे. 

View this post on Instagram

नेहमीच असते परफेक्ट, पण...

तशी तर ऐश्वर्या कोणत्याही आउटफिटमध्ये कमालच दिसते. ती कोणताही लूक तितक्याच खासप्रकारे कॅरी करते. पण या साडी ती फारच वेगळी आणि अधिक आकर्षक दिसत आहे. 


Web Title: Aishwarya Rai Bachchan looks stunning in this hot black and white Saree
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.