करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 08:00 AM2019-07-05T08:00:00+5:302019-07-05T08:00:02+5:30

सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर प्रियंकाला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला.

after the sky is pink priyanka chopra has no bollywood movie and is salman khan is reason | करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!!

करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!!

googlenewsNext
ठळक मुद्देसूत्रांचे मानाल तर, प्रियंकाने दोन कथा निवडल्या आहेत. प्रियंकाच्या टीमने या दोन कथांसाठी दिग्दर्शकाचा शोध सुरु केला आहे.

बॉलिवूड व हॉलिवूड अभिनेत्री यासोबतच भोजपुरी व मराठी सिनेमांची निर्माती अशी एक नवी ओळख प्रियंका चोप्राने निर्माण केली आहे. आता प्रियंका स्वत:साठी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. याचे कारण म्हणजे, अनेक प्रयत्न करूनही प्रियंकाला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाहीये. सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर तिला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. यादरम्यान संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला.

भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या चित्रपटात प्रियंका लीड रोलमध्ये होती. भन्साळींनी या चित्रपटाची गाणी बनवण्याचे कामही सुरु केले होते. पण अचानक भन्साळींनी हा चित्रपट थांबवून ‘इंशाअल्लाह’ची घोषणा केली. यात सलमान खान व आलिया भटला घेतले. सध्या भन्साळी दिवसरात्र या चित्रपटाच्या तयारीत गुंतले आहेत. साहजिकच प्रियंकाचा ‘हीरामंडी’ लटकला.


प्रियंकाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका जेव्हा केव्हा मुंबईत येते, तेव्हा कुण्या ना कुण्या बड्या निर्मात्याशी तिची मीटिंग होते. अनेक स्क्रिप्टवरही चर्चा होते. पण गोष्ट पुढे जाण्याआधीच काही ना काही कारणावरून चर्चा फिस्कटते. सध्या प्रियंकाजवळ केवळ ‘स्काय इज पिंक’ हा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे. अशास्थितीत आता प्रियंकाने स्वत:च स्वत:साठी चित्रपट प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय.

सूत्रांचे मानाल तर, तिने दोन कथा निवडल्या आहेत. प्रियंकाच्या टीमने या दोन कथांसाठी दिग्दर्शकाचा शोध सुरु केला आहे. अर्थात सलमानच्या भीतीमुळे कुणी मोठा दिग्दर्शक प्रियंकाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास राजी होईल, अशी शक्यता कमी आहे. पण प्रियंकाला लवकरात लवकर या चित्रपटाची घोषणा करायची आहे. आता याला तुम्ही करिअर वाचवण्याची धडपड म्हणा की आणखी काही पण प्रियंकाला आता चित्रपट हवा आहे. बॉलिवूडमध्ये नाव टिकवायचे तर हे करावेच लागणार.

Web Title: after the sky is pink priyanka chopra has no bollywood movie and is salman khan is reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.