का रखडला अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:00 PM2019-04-06T19:00:00+5:302019-04-06T19:00:02+5:30

‘संदीप और पिंकी फरार’ नेमका रखडला कुठे? असा प्रश्न सगळ्यांना पडला. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने एक नवी माहिती कानावर येतेय.

Is Aditya Chopra unhappy with Arjun Kapoor and Parineeti Chopra's Sandeep Aur Pinky Faraar? | का रखडला अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’?

का रखडला अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’?

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जुन कपूरच्या ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाच्या आधी म्हणजे २४ मे पूर्वी ‘संदीप और पिंकी फरार’ रिलीज होणार होता. पण आताश: ‘संदीप और पिंकी फरार’ आणखी लांबेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

यशराज फिल्म्सने २ जुलै २०१७ रोजी ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटाची घोषणा केली होती. यासाठी यशराजने अर्जुन कपूरपरिणीती चोप्रा यांना साईन केले होते. यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि जानेवारी २०१८ मध्ये चित्रपट बनून पूर्ण झाला. पण अद्यापही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. सर्वप्रथम गतवर्षी आॅगस्टमध्ये हा चित्रपट रिलीज होणार, अशी बातमी आली. पण यानंतर अचानक हा चित्रपट १ मार्च २०१९ला रिलीज होईल, असे जाहीर करण्यात आले. पण १ मार्च ही तारीख जावूनही  महिना उलटला. आता हा चित्रपट जूनमध्ये रिलीज होईल, असे सांगितले जातेय. पण अद्यापही याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ‘संदीप और पिंकी फरार’ नेमका रखडला कुठे? असा प्रश्न सगळ्यांना पडला. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने एक नवी माहिती कानावर येतेय. त्यानुसार, आदित्य चोप्रामुळे ‘संदीप और पिंकी फरार’ रखडल्याचे कळतेय.

होय, ताजी खबर खरी मानाल तर, आदित्य चोप्राने‘संदीप और पिंकी फरार’ पाहिला. पण या चित्रपटाबद्दल तो जराही समाधानी नाही. आदित्यचे मानाल तर, चित्रपटाची स्क्रिप्ट अतिशय उत्तम आहे. पण पडद्यावर ही कथा तितक्या उत्तमपणे साकारली गेली नाही. आदित्यच्या या रोखटोक भूमिकेनंतर एडिटींगद्वारे चित्रपटात काही दुरूस्त्या करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यातूनही फार काही चांगले निष्पन्न झाले नाही. त्यामुळे यातील काही सीन्स नव्याने शूट करण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपटाला तारखावर तारखा मिळाल्या. खरे तर अर्जुन कपूरच्या ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाच्या आधी म्हणजे २४ मे पूर्वी ‘संदीप और पिंकी फरार’ रिलीज होणार होता. पण आताश: ‘संदीप और पिंकी फरार’ आणखी लांबेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Web Title: Is Aditya Chopra unhappy with Arjun Kapoor and Parineeti Chopra's Sandeep Aur Pinky Faraar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.