‘प्यार तो होना ही था’ हा १९९८ मध्ये आलेला चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर यातील काजोलचा मंगेतर राहुल हाही आठवत असणार. होय, बिजय आनंद या अभिनेत्याने ही भूमिका साकारली होती. त्याची ती भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती. पण या चित्रपटानंतर बिजय आनंद अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला होता.

 गेल्या २० वर्षांत जणू तो अज्ञातवासात होता. पण आता तब्बल दोन दशकांनंतर या अभिनेत्याला पुन्हा एकदा इंडस्ट्री खुणावू लागली आहे. खरे तर आजघडीला बिजय आनंदला ओळखणेही कठीण आहे.  इतका  तो बदलला आहे. एकेकाळच्या या ‘चॉकलेटी’ चेहऱ्याच्या बिजयने आता दाढी वाढवली आहे. 

हाच बिजय आनंद सनी लिओनीच्या बायोपिकमधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परततो आहे. साहजिकचं ही आनंदाची बातमी आहे. पण तरिही गेल्या २० वर्षांत बिजय आनंद कुठे होता, काय करत होता, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे.

एका ताज्या मुलाखतीत बिजय आनंदने खुद्द या प्रश्नांची उत्तरे दिलीत. त्याने सांगितले की, ‘जब प्यार किया तो डरना क्या’ रिलीज झाल्यानंतर लोकांना माझे काम प्रचंड आवडले. या चित्रपटानंतर माझ्याकडे २२ चित्रपटांच्या आॅफर्स आल्यात. पण मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. खरे तर इंडस्ट्रीत येण्यासाठी मी बराच मोठा संघर्ष केला होता. पण जेव्हा यश मिळू लागले, तेव्हा मला हे नकोयं, असे आतून कुठेतरी वाटू लागले होते. २६ वर्षांच्या वयात मला आॅर्थराईटस सारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्याचक्षणी  आपल्या आरोग्याची परिणूर्ण काळजी घेईल, असे मी ठरवले आणि एका योगगुरूला भेटलो. यानंतर मी माझ्या आयुष्याची अनेक वर्षे योग विद्या शिकण्यात घालवली.

दरम्यानच्या काळात बिजयने टीव्ही अभिनेत्री सोनाली खरेसोबत लग्न केले. त्यांची सनाया नावाची एक मुलगी आहे. २० वर्षांनंतर बिजय आनंद मोठ्या पडद्यावर वापसी करतोय. अर्थात टीव्हीवर मात्र त्याने गतवर्षीचं एन्ट्री घेतली होती. ‘सिया के राम’मध्ये तो दिसला होता. सध्या तो एकता कपूरच्या ‘दिल ही तो है’मध्ये दिसतो आहे.


Web Title: The actor had rejected 22 movies! Now returning to Sunny Leone!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.