-तर आमिर खान बनला असता लंगडा त्यागी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 09:12 PM2018-08-17T21:12:50+5:302018-08-17T21:24:34+5:30

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, ‘ओंकारा’ची कल्पनाच मुळात आमिरची होती. होय, आमिरनेच विशाल यांना शेक्सपिअरचे नाटक ‘ओथेलो’ पडद्यावर साकारण्याचा सल्ला दिला होता.

Aamir wanted to play Langda Tyagi in Omkara | -तर आमिर खान बनला असता लंगडा त्यागी!!

-तर आमिर खान बनला असता लंगडा त्यागी!!

2006 मध्ये रिलीज झालेला ‘ओंकारा’ हा सुपरहिट चित्रपट सैफ अलीच्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉर्इंट होता. या चित्रपटात सैफने लंगडा त्यागीची भूमिका साकारली होती. सैफने या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला. पण समजा ही भूमिका सैफऐवजी आमिरने केली असती तर? होय, सर्वातआधी लंगडा त्यागीच्या या भूमिकेसाठी आमिर खान हाच सर्वात मोठा दावेदार होता. पण सैफने या भूमिकेसाठी आॅडिशन दिले आणि मग सगळेचं बदलले. आॅडिशनमधील सैफच्या अभिनयाने विशाल भारद्वाज इतके प्रभावित झालेत की, त्यांनी या भूमिकेसाठी त्यालाच फायनल केले. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, ‘ओंकारा’ची कल्पनाच मुळात आमिरची होती. होय, आमिरनेच विशाल यांना शेक्सपिअरचे नाटक ‘ओथेलो’ पडद्यावर साकारण्याचा सल्ला दिला होता. हा चित्रपट म्हणजे ‘ओंकारा’. आमिर व विशाल दोघांनीही या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू केली होती. आमिर तर लंगडा त्यागीची भूमिका करण्यास प्रचंड उत्सूक होता. चित्रपटाची स्क्रिप्टही तयार होती. पण अचानक आमिर व विशाल यांच्यात मतभेद झालेत आणि ‘ओंकारा’चे काम बंद पडले. पुढे विशाल यांनी हा चित्रपट पुन्हा हातात घेतला. पण लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी पुन्हा आमिरकडे जाण्याची विशाल यांची इच्छा नव्हती. मग त्यांनी सैफला या चित्रपटाची आॅफर दिली. सैफसाठी तर ही खूप मोठी संधीच होती. कारण त्यालाही आपल्या लव्हरब्वॉय इमेजमधून बाहेर पडायचे होते. पुढे या भूमिकेसाठी सैफला फिल्मफेअर अवार्ड मिळाला. चित्रपट सुपरहिट ठरला.

 

Web Title: Aamir wanted to play Langda Tyagi in Omkara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.