आमीर खान करणार 'ह्या' हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये काम, त्यासाठी घेतोय अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 09:00 PM2019-01-09T21:00:00+5:302019-01-09T21:00:00+5:30

आगामी चित्रपटासाठी आमीर आगामी चित्रपटासाठी फिटनेस फ्रिक झाला आहे.

Aamir khan worked in the remake of 'This' Hollywood movie, working hard to get it | आमीर खान करणार 'ह्या' हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये काम, त्यासाठी घेतोय अशी मेहनत

आमीर खान करणार 'ह्या' हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये काम, त्यासाठी घेतोय अशी मेहनत

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान भूमिकेसाठी जी-तोड मेहनत घेतो. सध्या आगामी चित्रपटासाठी आमीर आगामी चित्रपटासाठी फिटनेस फ्रिक झाला आहे. या चित्रपटात स्लीम व तरूण दिसायचे आहे. यासाठी तो स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो आहे. तो हे सगळे १९९४ साली प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पच्या हिंदी रिमेकसाठी करत असल्याचे बोलले जात आहे. 

नुकतेच आमीरने पत्रकारांना सांगितले की, 'आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी स्ट्रिक्ट डाएट करतो आहे.' सूत्रांच्या माहितीनुसार, आमीर टॉम हँक्सची भूमिका करणार असून तो चित्रपटात साधारण माणूस दाखवला होता. या चित्रपटात राजनीती, इतिहास, संघर्ष व प्रेम अशा सर्व गोष्टींचा समावेश असणारी कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे. आमीर खान प्रोडक्शनने मागील वर्षी पॅरामाउंट पिक्चर्सकडून अधिकार विकत घेतले आहेत. आमीर आधीपासून टॉम हॅंक्सपासून प्रेरीत असून त्याच्या अभिनयातून बरेच बारकावे त्याने शिकले आहेत.
फॉरेस्ट गम्प चित्रपटाची कथा फॉरेस्टमधील व्यक्तीवर आधारीत आहे. त्याला यश मिळाल्यानंतर तो ऐतिहासिक पुरूष बनतो. त्याची प्रेयसी त्याला सोडून जाते. यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाला सहा ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट लेखक विन्सटन ग्रुम यांचा १९८६ साली आलेला कादंबरीवर आधारीत आहे. अद्याप आमीरने फॉरेस्ट गम्प चित्रपटाच्या रिमेकबाबत दुजोरा दिला नाही. मात्र या चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमीरला पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Aamir khan worked in the remake of 'This' Hollywood movie, working hard to get it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.