मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 09:56 AM2018-11-27T09:56:52+5:302018-11-27T09:57:22+5:30

माध्यमांशी बोलताना आमिरने मोठ्या मनाने प्रेक्षक मायबापाची माफी मागितली. मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलो नाही. मी या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,असे आमिर म्हणाला.

aamir khan apologises for thugs of hindostan failure i take full responsibility | मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का?

मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ भारतात अपयशी ठरला. पण आता हा चित्रपट चीनमध्ये रिलीज होणार आहे. ‘दंगल’नंतर चीनमध्ये आमिर प्रचंड लोकप्रीय झाला आहेत. त्यामुळे चीनी प्रेक्षकांना आमिरचा हा चित्रपट किती आवडतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘

आमिर खानचा नुकताच रिलीज झालेला ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ या चित्रपटाला समीक्षकांनी हिणवले आणि नंतर पे्रक्षकांनीही या सिनेमाकडे पाठ फिरवली. एकंदर काय तर ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ फ्लॉप झाला. हा सिनेमा फ्लॉप झाल्याची जबाबदारी आमिरने स्वीकारली असून प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
माध्यमांशी बोलताना आमिरने मोठ्या मनाने प्रेक्षक मायबापाची माफी मागितली. मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलो नाही. मी या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. माझ्यामते,आमचे काहीतरी चुकले असावे.अर्थात काही लोकांना हा चित्रपट अतिशय आवडलाही. प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने माझा चित्रपट पाहण्यासाठी आले असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मी त्यांचे मनोरंजन करू शकलो नाही. हा माझ्यासाठी एक दु:खद अनुभव आहे. कारण माझे काम आणि माझे चित्रपट यापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही. मी माझ्या पोटच्या मुलांसारखा माझ्या चित्रपटांवर प्रेम करतो, असे आमिर यावेळी म्हणाला.
‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ भारतात अपयशी ठरला. पण आता हा चित्रपट चीनमध्ये रिलीज होणार आहे. ‘दंगल’नंतर चीनमध्ये आमिर प्रचंड लोकप्रीय झाला आहेत. त्यामुळे चीनी प्रेक्षकांना आमिरचा हा चित्रपट किती आवडतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ हा एक पीरियड ड्रामा आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट भारतात ५००० स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. आमिर व अमिताभ या जोडीने या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या दोघांशिवाय कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेखही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

Web Title: aamir khan apologises for thugs of hindostan failure i take full responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.