बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतांचा फटका राष्ट्रवादीला ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:58 PM2019-04-06T14:58:08+5:302019-04-06T14:58:58+5:30

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह जवळपास आठ नोंदणीकृत पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Vanchit Bahujan Aaghadi cuts NCP's votes in Beed? | बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतांचा फटका राष्ट्रवादीला ? 

बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतांचा फटका राष्ट्रवादीला ? 

Next

- सतीश जोशी

बीड : जयसिंग गायकवाड हे १९९९ साली भाजपकडून, तर २००४ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ साली भाजपचे गोपीनाथराव मुंडे तर २०१४ च्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे या, तर जवळपास सात लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी 
झाल्या होत्या. 

२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीचा अभ्यास केला तर गोपीनाथरावांना मिळालेली मतांची टक्केवारी जवळपास ५२ टक्के म्हणजे झालेल्या एकूण मतांच्या निम्म्याहून अधिक आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश आडसकरांना ३८ टक्के तर २०१४ मध्ये सुरेश धस यांना जवळपास ४० टक्के मते मिळाली होती. याचाच अर्थ गोपीनाथराव हे २००९ मध्ये १३ टक्के आणि २०१४ मध्ये ११ टक्के अधिक मतांनी विजयी झाले होते. 

ज्या पक्षांचा मुस्लीम आणि मागासवर्गीय मतांवर अधिक प्रभाव आहे, त्या बसपाला २००९ मध्ये २.३५ टक्के म्हणजे २५२८४ मते, भारीप बहुजन महासंघाचे कचरू खळगे यांना १ टक्का म्हणजे ११, ००६  मते मिळाली.  
२०१४ साली बसपाला १.१५ टक्के म्हणजे १४१६६ मते मिळाली. गोपीनाथराव हे २००९ मध्ये १,४०,९५२ मतांनी तर २०१४ साली १,३६,४५४ मतांनी विजयी झाले होते. भाजपची मतांची टक्केवारी वाढत असून २०१४ च्या पोटनिवडणुकीत तर ७१ टक्क्यांपर्यंत विक्रमी वाढ झाली होती.

बीड लोकसभा मतदारसंघात २००४ चा एकमेव अपवाद वगळला तर गेल्या पाच निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे.  या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह जवळपास आठ नोंदणीकृत पक्षही रिंगणात उतरले आहेत. या पक्षांना मिळणारी मते ही बहुतांश भाजपविरोधी आहेत. या मतांचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास फटका बसणार आहे. 

Web Title: Vanchit Bahujan Aaghadi cuts NCP's votes in Beed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.