अडाण्यापासून उच्चशिक्षित उमेदवार बीडच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:30 AM2019-04-11T00:30:36+5:302019-04-11T00:32:23+5:30

देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा असल्याने या मतदार संघाचे राजकीयदृष्ट्या महत्व आहे.

A highly educated candidate from Adana to bead's field | अडाण्यापासून उच्चशिक्षित उमेदवार बीडच्या मैदानात

अडाण्यापासून उच्चशिक्षित उमेदवार बीडच्या मैदानात

Next
ठळक मुद्देराजकीय आखाड्यातील शिक्षण : बीड लोकसभेच्या रिंगणात हौसे, गवसे, नवसेही

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा असल्याने या मतदार संघाचे राजकीयदृष्ट्या महत्व आहे. त्यातल्या त्यात मुंडे बहिण- भावांमध्ये रंगणाºया प्रचारयुद्धाने हा मतदार संघ ढवळून निघाला आहे.
बीड लोकसभा मतदार संघात भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह इतर सात अशा एकूण दहा पक्षांचे उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. तर २६ उमेदवार अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. देशाच्या दृष्टीने महत्वाची असलेल्या लोकसभा निवडणुकीकडे मतदार कशा रितीने पाहतात हे १८ एप्रिलच्या मतदानातून दिसून येईल. परंतु रिंगणात उतरताना इतर कोणालातरी मदत होईल याचे गणित बांधत सोयीच्या उमेदवाराने अशा अपक्षांना विशिष्ट भागात मैदान मोकळे सोडले आहे. लोकसभेसाठी लोकप्रतिनिधी निवडून देताना त्याचा राजकीय प्रभाव, संघटनात्मक बांधणी, मॅन, मनी, मसल ‘थ्री एम’ फॅक्टर व्यवस्थापन कौशल्यातून चांगल्या तºहेने हाताळणारा उमेदवार मैदानात टिकून राहतो, असा जनतेचा अनुभव राहिलेला आहे. तसेच लोकसभा निवडणूक लढविणाºया उमेदवाराचे शिक्षण हाही महत्वाचा विषय असतो.
बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण कितीही असो पण लोकप्रतिनिधी बनण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे दिसते. २० लाख मतदारांमध्ये आपला टिकाव राहील की नाही याचा विचार न करता हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही उमेदवार तर प्रत्येक निवडणुकीत (पालिका, विधानसभा, लोकसभा) आपले नशीब अजमावत राहिले परंतु लोकप्रतिनिधी होण्याची संधी त्यांना अद्याप मतदारांनी दिलेली नसल्याचे दिसते.
बीड मतदार संघाच्या निवडणुकीत अगदी अशिक्षितापासून उच्च शिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. काही जण इयत्ता तिसरी उत्तीर्ण आहेत. तर बहुतांश जण बारापवीपर्यंत शिकलेले आहे.
प्रमुख पक्षांचे उमेदवार अन् शिक्षण
भाजपा - डॉ. प्रीतम मुंडे - (एम.डी.)
राष्टÑवादी काँग्रेस - बजरंग सोनवणे,
(बी.ए. कला पदवीधर),
वंचित बहुजन आघाडी -
प्रा. विष्णू जाधव -
(एम.कॉम.,बी.एड.)
हम भारतीय पार्टी -
अशोक थोरात (दहावी नापास)
भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
कल्याण गुरव (बारावी.)
महाराष्टÑ क्रांती सेना -
गणेश करांडे, (बी.ए.एल.एल.बी, एम.बी.ए.,बी.जे.)
दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल- रमेश गव्हाणे- (बारावी)
आंबेडकराईट पार्टी - चंद्रप्रकाश शिंदे - (दहावी)
समाजवादी पार्टी - सय्यद मुजम्मील स. जमील- (बारावी)

Web Title: A highly educated candidate from Adana to bead's field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.