लाइव न्यूज़
 • 01:07 PM

  नाशिक : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या स्वागतप्रकरणी सुकाणू शेतकरी समितीच्या आक्रमक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

 • 01:06 PM

  ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अॅन्टी रॉबरी सेल,पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 ठाणे पोलीस यांची उत्तम कामगिरी, 17 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 407 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8,27,000 रुपये किमतीचा माल केला हस्तगत. 4 जण अटकेत.

 • 12:48 PM

  औरंगाबाद : भरधाव वेगाने जाणा-या बाईकस्वाराने रस्ता ओलांडणा-या 2 विद्यार्थ्यांना उडवले. जालना रोडवर एसएफएस स्कूल समोरील घटना.

 • 12:31 PM

  नगर : परप्रांतीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या. नगर जवळील विळद घाटातील घटना.

 • 12:27 PM

  भारताच्या एक बाद 102 धावा, मुरली विजय नाबाद (61), चेतेश्वर पूजारा नाबाद (33).

 • 12:25 PM

  मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप फास्‍ट लाइनवर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक.

 • 12:25 PM

  हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. मृत शेतक-याचे नाव विष्णू जाधव .

 • 12:24 PM

  कोणत्याही अन्य उत्पादकांना दिली नाही एवढी मदत ऊस उत्पादकांना दिली - चंद्रकांतदादा पाटील.

 • 12:23 PM

  सोलापूर : मंगळवार पेठ येथील चाटला साडी सेंटर येथे चोरी, 10 लाख रुपयांचे साहित्य लंपास.

 • 11:58 AM

  भाजपच्या ध्वजाचा रंग एवढा गडद आहे की आता वैभव नायकवडी सोबत बसल्याने तेही आमच्याच रंगात असल्याचे आम्ही समजतो - चंद्रकांत पाटील.

 • 11:58 AM

  जालना - शहरातील चंदनझिरा भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सकाळी फुटली, लाखो लिटर पाणी वाया.

 • 11:57 AM

  भिवंडीतील ढिगाऱ्याखाली सापडला महिलेचा मृतदेह.

 • 11:23 AM

  औरंगाबाद - शहरात पहिली लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया 'एमजीएम' मध्ये सुरु, गुजरातमधून आले डॉक्टरांचे पथक.

 • 11:18 AM

  मुरली विजयचे नाबाद अर्धशतक (54), भारताच्या 1 बाद 93 धावा, चेतेश्वर पूजारा नाबाद (30).

 • 11:14 AM

  नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कोटी देणार - देवेंद्र फडणवीस.

All post in लाइव न्यूज़

वृश्चिक

आज

२५ नोव्हेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणो पूर्ण कराल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. एखादा निर्णय अनपेक्षितपणो झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. आपली इच्छापूर्ती होईल. विविध उपक्रम राबविण्यात यश येईल. 

शुभदिनांक  24,25

मासिक भविष्य

नवीन कल्पना आकार घेतील. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. गृहउद्योगातून चांगला फायदा होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणो पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असणा:या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. एखादा निर्णय अनपेक्षितपणो झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. आपली इच्छापूर्ती होईल. विविध उपक्रम राबविण्यात यश येईल.  तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.  संततीची उन्नती होईल.  नोकरीत वरिष्ठांकडून एखादी सवलत मिळेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याकरीता सतत प्रय}शील राहाल. प्रसंगनिष्ठ राहून आपले काम साधून घेण्यात आपल्याला यश लाभणार आहे.  

प्रमोटेड बातम्या