Lok Sabha Election 2019; राष्ट्रसंतांच्या मोझरीचा युद्धपातळीवर विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:23 AM2019-04-07T01:23:41+5:302019-04-07T01:24:25+5:30

राष्ट्रसंतांच्या मोझरी तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या विशेष आराखड्यात समावेश करून येथील विकास करण्याचा संकल्प महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला. शिरजगाव मोझरी येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या सभेला तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती.

Lok Sabha Election 2019; Development of the Monsoon | Lok Sabha Election 2019; राष्ट्रसंतांच्या मोझरीचा युद्धपातळीवर विकास

Lok Sabha Election 2019; राष्ट्रसंतांच्या मोझरीचा युद्धपातळीवर विकास

googlenewsNext
ठळक मुद्देनवनीत राणा : शिरजगाव मोझरी येथे प्रचारसभा, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रसंतांच्या मोझरी तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या विशेष आराखड्यात समावेश करून येथील विकास करण्याचा संकल्प महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला. शिरजगाव मोझरी येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या सभेला तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणा यांच्यासारख्या तडफदार खासदाराची गरज असल्याचे ठाकूर म्हणाल्या. मतदानाला अवघे ११ दिवस शिल्लक असताना प्रचाराची रणधुमाळी उठली आहे.
आ. यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघाचा केलेला विकास उल्लेखनीय असून, आपण खासदार झाल्यावर एकत्रितपणे काम करू, ज्यामुळे तिवसा मतदारसंघाच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला. महिलांच्या हाताला काम देण्यासाठी शिरजगाव मोझरीसह जिल्ह्यातील प्रत्येक गावात गृहउद्योग उभारला जाईल. त्याचप्रमाणे शिरजगाव मोझरी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे, गावातील गोरगरिबांना हक्काचे घर, रस्ते, नाल्या, पूल, सांस्कृतिक भवन उभारण्यास प्राथमिकता राहील. तिवसा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल, असे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी सरपंच कविता हिवराळे, ज्योती देवघरे, रिना डांगोरे, रत्नमाला अंबूलकर, उमा जिपाकरे, लता कुबडे, कुसुम बालपांडे, नीलिमा कारमोरे, रेखा राघोते, वंदना पचघारे, वर्षा बेले, नीलिमा वाघ, कल्पना कुरयकर, ज्योती वाघ, संगीता बन्सोड, शीतल डेहनकर, चित्रा तायवाडे, तेजस्विनी खेरडे, बेबी लगोडे, रेखा मेश्राम, वनिता हगवणे, माला खराटे, दर्शना चिचखेडे, मंजूषा खोब्रागडे, सुलोचना तायवाडे, वैशाली डहाके, द्वारका गोहत्रे, पुष्पा हांडे, सुनंदा ठाकरे, वत्सला वाघ, वेणू पन्नासे, जिल्हा संपर्कप्रमुख जितू दुधाने, ज्योती सैरिसे, धीरज केने, बंडू जाधव, संदेश मेश्राम, प्रभाकर फटिंग, ऋषीकेश गाडगे, संजय साखरवाडे, दादाराव फटिंग, शंकर राघोते, प्रकाश लंगडे, गजानन उमक, किशोर वाघ, प्रकाश सोनटक्के, विठ्ठल जिभकाटे, अरुण मेहरे, शरीफ पठाण, प्रफुल्ल फटिंग, प्रवीण डांगोरे, प्रकाश लंगडे यांच्यासह हजारो महिला-पुरुषांची उपस्थिती होती.
नवनीत यांनी उभारली गुढी
नवनीत राणा यांनी शनिवारी शंकरनगर स्थित ‘गंगा सावित्री’ या निवसास्थानी गुढी उभारली, तर रविनगर स्थित संकटमोचन हनुमान मंदिरातील झेंड्याचे पूजन केले. यावेळी मंदिराचे पुजारी सीतारामजी महाराज, माजी नगरसेविका शोभा पाटणे, नाना सावरकर, सचिन भेंडे, भूषण पाटणे, दत्ता गिरी, नंदू मांडळे, पराग चिमोटे, रूपेश शेटे, सौरभ उगवकर, दीपक साहू आदींची उपस्थिती होती.
विविध संघटनांचा पाठिंबा
अपंग समाजवादी संघ

अमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई), युवा स्वाभिमान महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना अमरावती जिल्हा अपंग समाजवादी संघातर्फे जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र महासचिव अनवार शाह मुख्तार शाह यांनी प्रसृत केले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
भारतीय मानवाधिकार परिषद
अमरावती : भारतीय मानवाधिकार परिषद व मजदूर युनियनने अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुस्लिम क्षेत्रातील विकास, आरक्षण आणि शिक्षण या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र अध्यक्ष सलमान सलीम खान, शहर अध्यक्ष सजील खान, सहसचिव सै. अरशद, सै. मोहसीन यांनी स्पष्ट केले.
महिला मुक्ती मोर्चा
अमरावती : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचक कर्जाविरुद्ध लढा देणाऱ्या महिला मुक्ती मोर्चाने लोकसभेच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या प्रचारात ताकद पणाला लावू, असा निर्धार व्यक्त करणारे पत्र मोर्चाचे अध्यक्ष अशोक खरात, प्रदेश अध्यक्ष संगीता वाघ यांच्या स्वाक्षरीनिशी शनिवारी देण्यात आले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Development of the Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.