Lok Sabha Election 2019; भाजपचाही सेनेच्या हातात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:28 PM2019-04-08T23:28:23+5:302019-04-08T23:29:09+5:30

लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिकाणी रुसवे फुगवेदेखील सुरू आहेत.

Lok Sabha Election 2019; The BJP also hands in the hands of the army | Lok Sabha Election 2019; भाजपचाही सेनेच्या हातात हात

Lok Sabha Election 2019; भाजपचाही सेनेच्या हातात हात

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दोन सभा : लोकसभेच्या प्रचाराआड विधानसभेची रंगीत तालीम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिकाणी रुसवे फुगवेदेखील सुरू आहेत.
अमरावती लोकसभेच्या पालकत्वाची जबाबदारी भाजपद्वारे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे, तर लोकसभेचे प्रभारी पालकमंत्री प्रवीण पोटे व निवडणूक प्रमुख दिनेश सूर्यवंशी आहेत. शहरात आमदार सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, शहराध्यक्ष जयंत डेहणकर व नगरसेवक यांच्या नियमित बैठकीत कार्यालयात होतात. परंतु, शुक्रवारी युतीचे केंद्रीय कार्यालय सुरू झाल्याने त्या ठिकाणीदेखील सकाळ-सायंकाळी नियोजन सुरू असल्याचे दिसून आले.
अडसुळांना स्वकीयांच्या विरोधाचा जेवढा सामना करावा लागला, तेवढा मित्रपक्षात होताना दिसत नाही. किंबहुना शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ असल्याने उमेदवार कोण, ही त्यांची जबाबदारी. आम्ही युतिधर्म पाळणार ही भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून घेतली आहे. जिल्ह्यात भाजपचे आमदार सुनील देशमुख, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले व मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्यासोबत आनंदराव अडसूळ यांचे ट्युनिंग चांगले आहे. यासोबतच भाजपच्या अंतर्गत राजकारणात कुठलीही ढवळाढवळ करण्यात आनंदराव अडसूळ यांनी मागील दोन टर्ममध्ये स्वारस्य दाखविले नाही. याचा फायदादेखील त्यांना या निवडणुकीत होत आहे. युतिधर्म निभावताना फारसे रूसवे- फुगव्यांचा सामना आता अडसुळांना करावा लागला नाही.
६७ हजार कार्यकर्त्यांची फळी
लोकसभेसाठी बुथप्रमुख, शक्तिप्रमुख व विस्तारक अशी ६७ हजार कार्यकर्त्यांची फळी अडसुळांच्या पाठीशी आहे. नियमित बैठकीद्वारे नियोजन सुरू आहे. कार्यकर्ते कुठल्याही अपेक्षेविना, युतिधर्म निभवत आहेत.
- दिनेश सूर्यवंशी, लोकसभा प्रमुख
शिस्तबद्ध प्रचार, नियमित आढावा
विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुखनेमलेले आहेत. याशिवाय पक्षाचे व उमेदवारांच्या नियोजनानुसार नियमित अन् अत्यंत शिस्तबद्ध प्रचार सुरू आहे. बैठकीद्वारे प्रचाराचा नियमित आढावा घेण्यात येतो. बूथप्रमुखांशी नियमित संपर्क सुरू आहे.
- निवेदिता चौधरी, प्रदेश सचिव, भाजप

विधानसभा प्रमुखांच्या बैठकींचा रतीब अन् कार्यालयात आढावा
1शहर कार्यालयात जयंत डेहणकर, महापौर सजंय नरवणे, नगरसेवकांसह बूथप्रमुख, विस्तारकांच्या नियमित बैठका व दिवसभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
2तिवसा येथे प्रदेश सचिव निवेदिता चौधरी व मतदारसंघ प्रमुख नामदेवराव मुंगले यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी प्रचार दौरे, दैंनदिन प्रचाराचे नियोजन केले जाते.
3मेळघाट मतदारसंघ मोठा असल्याने विधानसभा प्रमुख आप्पा पाटील यांच्या जोडीला गोलू मुंडे व प्रवीण तायडे सोबतीला आहेत. गावनिहाय प्रचाराचा आढावा ते घेत आहेत.
4दर्यापुरात प्रमुख अनिल पुंडलवार कार्यकर्त्यांशी संवाद, नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी संवाद, तर आ. बुंदिले बूथप्रमुख, शक्तिप्रमुखांशी संवाद करीत आहेत.
5अचलपूर विधानसभाप्रमुख प्रताप अभ्यंकर कार्यकर्त्यांशी संवाद, रीतेश नवले हे कार्यकर्त्यांशी चर्चा व नीलेश सातपुते हे प्रचाराचे नियोजन यावर भर देत असल्याचे दिसून आले.
6बडनेºयात व भातकुलीमध्ये शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांच्या स्वतंत्र बैठकी सुरू आहेत. उमेदवारांनी प्रत्येक भागात पोहोचलेच पाहिजे, यासाठीची चर्चा होत आहे.

राजापेठ चौकातील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष जयंत डेहनकर , महापौर संजय नरवणे, तुषार भारतीय आदींद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बूथप्रमुख, शक्तिप्रमुख यांना प्रचारासंदर्भात सूचना देताना.

Web Title: Lok Sabha Election 2019; The BJP also hands in the hands of the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.