vikhe win a historic victory - Anil Rathod | विखेंचा ऐतिहासिक विजय होणार - अनिल राठोड
विखेंचा ऐतिहासिक विजय होणार - अनिल राठोड

अहमदनगर : नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा ऐतिहासिक विजय होणार आहे, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड म्हणाले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ नगर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपती येथे श्रीफळ वाढवून आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय अगरकर, माजी महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, सुनिल रामदासी, सुवेंद्र गांधी यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर शहरातील प्रमुख मार्गावरुन या पदयात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.


Web Title: vikhe win a historic victory - Anil Rathod
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.