विखे पाटील यांचे लोणीत, तर निलेश लंके यांचे हंगा येथे मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:09 AM2024-05-13T10:09:12+5:302024-05-13T10:09:35+5:30

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सकाळी लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.

Vikhe Patil voted in Loni, while Nilesh Lanka voted in Hanga ahmednagar lok sabha Election update | विखे पाटील यांचे लोणीत, तर निलेश लंके यांचे हंगा येथे मतदान

विखे पाटील यांचे लोणीत, तर निलेश लंके यांचे हंगा येथे मतदान

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी (ता. राहता) येथे मतदानाचा हक्क बजावला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार  नीलेश लंके यांनी  हंगा( ता. पारनेर)  येथे मतदानाचा हक्क बजावला.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सकाळी लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. लोणी ( ता. राहता) हे गाव शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते. त्यांच्यासोबत त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, पत्नी धनश्री विखे पाटील व परिवाराने लोणी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

आमदार निलेश लंके यांनी त्यांचे गाव हंगा( ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत त्यांचे आई- वडील व पत्नी राणी लंके यांनीही सोबतच मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Vikhe Patil voted in Loni, while Nilesh Lanka voted in Hanga ahmednagar lok sabha Election update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.