स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:58 AM2019-04-15T11:58:05+5:302019-04-15T11:59:18+5:30

सुजय विखे केवळ निवडणुका लढविण्यासाठी दक्षिणेत येतात आणि भाषणे करतात. स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. तमाशा मंडळासारखा ते प्रचाराचा फड घेऊन येतात,

No talks on local question: Sangram Jagtap | स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत : संग्राम जगताप

स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत : संग्राम जगताप

Next

शेवगाव : सुजय विखे केवळ निवडणुका लढविण्यासाठी दक्षिणेत येतात आणि भाषणे करतात. स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. तमाशा मंडळासारखा ते प्रचाराचा फड घेऊन येतात, अशी टीका राष्टÑवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विखे यांच्यावर केली आहे.
जगताप यांनी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, ढोरसडे, अंत्रे, शहरटाकळी, भाविनिमगाव, मठाची वाडी, घोटण, गदेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी, लाडजळगाव, चापडगाव, तसेच शेवगाव शहरातील विविध प्रभागात रविवारी प्रचार सभा घेतल्या. यावेळी शहरटाकळी येथील सभेत त्यांनी ही टीका केली. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे, राम साळवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, संदीप मोटकर आदी उपस्थित होते़
जगताप म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर उत्तरेची मंडळी निघून जाणार आहे. आपण मात्र जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणार असून नगर बरोबरच दक्षिणेचा ‘संग्राम’ म्हणून सेवा करण्यासाठी केव्हाही तत्पर असेऩ हक्काच्या माणसाला साथ करा असे आवाहन त्यांनी केले़
सध्याच्या सरकारने शेतकरी, छोटे व्यावसायिक, युवक, महिला, जेष्ठ नागरिक अशा सर्व घटकांना केवळ फसविण्याचे काम चालविलेले आहे़ त्यामुळे घोषणाबाज, थापेबाज सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे नरेंद्र घुले यांनी सांगितले़ यावेळी मुकुंद जमधडे, बाबूलाल पटेल, सचिन फटांगडे, संजय पवार, राहुल बेडके, राम घुमरे, सखाराम लवाळे, निवृत्त दातीर, दिनकर बडधे, मारुतीराव जाधव, जगन्नाथ गावडे आदींसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: No talks on local question: Sangram Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.