नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:58 AM2019-04-29T10:58:42+5:302019-04-29T11:00:40+5:30

तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या एका मतदाराने आपला हक्क बजावला.

 Boycott voted out of Bahirwadi, Thamori villages of Nevha taluka | नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Next

नेवासा : तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या 7 मतदाराने आपला हक्क बजावला.
विजेच्या खांबवर शॉक बसल्याने नितिन राजेंद्र घोरपडे यांचा मृत्यू झाला होता. घोरपडे यांचा मृतदेह ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आंदोलन केले होते. याप्रकरणी मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी सात ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा धामोरी व बहिरवाडी ग्रामस्थांनी दिला होता.
तालुक्यातील नेवासा शहर, माका, जळके, कुकाणा, मुकिंदपूर, भेंडा या गावातील मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी अर्धा तासाने तर काही ठिकाणी एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती.

मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
वादळाने झालेली बिघाड दुरूस्त करताना विजेच्या झटक्याने ठार झालेल्या तरूणाच्या मृतदेहाची विटंबना करणे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे नातेवाईक व सहकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. न्याय मिळण्यासाठी चार ते पाच तास मृतदेह ताटकळत ठेवून विटंबना केल्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गणेश घोरपडे, बापु घोरपडे, नंदु वाखुरे, प्रकाश घोरपडे, लाला हारदे, सोमनात वाखुरे, सतिष वाखुरे व इतर दोन ते तिन जणांच्या समावेश आहे.
रविवारी दुपारी बेलपांढरीफाटा येथे नितीन राजेंद्र घोरपडे (वय २४ रा.बहिरवाडी ता.नेवासा ) हा कंत्राटी कामगार बिघाड दुरूस्ती कऱण्यासाठी वेजेच्या खांबावर चढला होता. यावेळी विजेचा प्रवाह चालू झाल्याने जबर शॉक लागून नितीनचा भाजून जागेवरच मृत्यु झाला होता. त्यावेळी संतापलेल्या नातेवाईकांनी या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच त्यांना घटनास्थळी बोलवावे यासाठी नितीनचा मृतदेह काढू दिला नाही त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्या नंतर तो खाली काढण्यात आला परंतू पुन्हा सदरचा मृतदेह नातेवाईक व ग्रामस्थांनी तो नेवासा येथील महापारेषणच्या १३२ केव्ही विज उपकेंद्र कार्यालयाच्या दारात आणून ठेवत या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून शासकीय मदतीची लेखी अश्वासन मागत मृतदेहावर पुढील सोपस्कार करण्यास नकार देत तब्बल तिन तास ठिय्या मांडला होता. वरिष्ठांनी लेखी अश्वासन दिल्या नंतर व दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच सोमवारी पुन्हा या प्रकरणाने उचल खालली. पोलिस हेड कॉन्सेटबल जयसिंग एन अव्हाड यांच्या फिर्यादीवरून सात जणांच्या विरोधात मृतदेहाची विटंबना व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Boycott voted out of Bahirwadi, Thamori villages of Nevha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.