अरबपती फरार, शेतकरी तुरुंगात : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:57 AM2019-04-27T11:57:44+5:302019-04-27T12:04:30+5:30

कोट्यवधीचे कर्ज बुडविणारे उद्योगपती चौकीदाराच्या राज्यात फरार आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र वीस हजाराच्या कर्जासाठी तुुरुंगात टाकले जाते.

Billionaire absconding, in farmer's prison: Rahul Gandhi | अरबपती फरार, शेतकरी तुरुंगात : राहुल गांधी

अरबपती फरार, शेतकरी तुरुंगात : राहुल गांधी

googlenewsNext

संगमनेर : कोट्यवधीचे कर्ज बुडविणारे उद्योगपती चौकीदाराच्या राज्यात फरार आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र वीस हजाराच्या कर्जासाठी तुुरुंगात टाकले जाते. मोदी सरकारचा असा फसवा कारभार असून यापुढे कुठल्याही शेतकºयाचे कर्ज थकले म्हणून त्याला अटक करता येणार नाही, असा कायदा काँग्रेस करणार असल्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथील सभेत दिले. आमची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार व २२ लाख रिक्त सरकारी जागा तरुणांच्या हवाली करणार असेही ते म्हणाले.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री येथील जाणता राजा मैदानावर गांधी यांची सभा झाली. या सभेत काँग्रेस व मित्रपक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. व्यासपीठावर काँगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आमदार सुधीर तांबे, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक, सत्यजित तांबे, अनुराधा नागवडे, अनुराधा आदिक, आशुतोष काळे, पांडुरंग अभंग, विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, उत्कर्षा रुपवते उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आश्वासनांचे वाभाडे काढले़ ते म्हणाले, मोदी यांनी २ कोटी रोजगार देण्याचे, शेतमालाचे भाव दुप्पट करण्याचे, पंधरा लाख रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन गत पाच वर्षांपूर्वी जनतेला दिले होते. प्रत्यक्षात हे काहीही झालेले नाही़ त्यांनी केवळ अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यावर कर्जांची खैरात केली़ मल्ल्या, चोक्सी, मोदी हे कर्ज बुडवून परदेशात पळाले़ अरबपती लंडनमध्ये आणि आमच्या शेतकºयांनी कर्ज भरले नाही म्हणून ते तुरुंगात अशी मोदी यांची नीती आहे.
मोदींनी उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, गरिबांना काहीच दिले नाही़ गरिबांसाठी काय करता येईल म्हणून आम्ही अर्थतज्ज्ञांबरोबर अभ्यास करुन ‘न्याय योजना’ बनवली आहे. काँगे्रस गरिबांच्या खात्यावर न्याय योजनेतून प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये व वर्षाला ७२ हजार रुपये टाकणार आहे. २५ कोटी लोक व पाच कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळेल. हा आमचा चुनावी जुमला नसून ते वस्तुस्थितीत उतरणार आहे. या योजनेचा अर्थव्यवस्थेवर काहीही विपरित परिणाम होणार नाही. उलट हा पैसा चलनात येऊन वस्तूंची विक्री व उत्पादन वाढेल. रोजगार निर्माण होतील. सध्या देशात २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत़ या सर्व नोकºया काँगे्रस सरकार तरुणांच्या हवाली करणार आहे. १० लाख तरुणांना पंचायतींमध्ये रोजगार मिळेल़ काँगे्रस सत्तेत आल्यास शेतकºयांसाठी स्वतंत्र बजेट तयार केले जाईल़ त्यात शेतकºयांना त्या वर्षात आम्ही किती पैसे देणार हे जाहीर केले जाईल. तसेच हमीभावही सांगितले जातील.
वायू सेनेने राफेल प्रकरणात मोदी हे फ्रान्सच्या कंपनीशी समांतर बोलणी करीत आहेत, असा ठपका ठेवलेला आहे़ ३० हजार कोेटी रुपये मोदींनी राफेलमध्ये अनिल अंबानींना दिले आहेत़ त्यामुळे यांचा कारभार सत्य कसा? असा प्रश्न गांधी यांनी केला़. मोदी यांचे ‘झूठ’ व आमची ‘सच्चाई’ असा हा सामना आहे. त्यांची ‘नफरत’ व आमचा ‘भाईचारा’ अशी ही लढाई असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसच जिंकणार असल्याचा आशावाद त्यांनी भाषणात शेवटी व्यक्त केला. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, काँग्रेसने शेती, तंत्रज्ञान यात प्रगती केली. पण काँग्रेसने काहीच केले नाही, असे मोदी म्हणतात. ही लोकशाही वाचविण्यासाठीची निवडणूक आहे. ही न्याय अन्यायाची निवडणूक आहे. सीबीआय, विद्यापीठ या सारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करत मोदी हे त्यांना हवी ती माणसे या संस्थांमध्ये बसवत आहेत. त्यांना संविधान बदलायचे असून देशात मनुस्मृती आणायची आहे.
अशोक चव्हाण यांनी सभेत मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, मोदी यांची छाती ५६ इंचाची नाही. यांची पोटे वाढली आहेत. शिवसेना ही भाजपपुढे लाचार आहे. सुरेश प्रभूंच्या विमानातील सुटकेसमध्ये काय होते ते कळले पाहिजे. सुटकेसमध्ये आंबे होते की पैसे? निवडणुकीच्या काळात या सुटकेसमध्ये काय आले याचा जनतेला खुलासा हवा आहे. मुख्यमंत्री राहुल गांधींवर टीका करतात तेवढी त्यांची लायकी आहे का? भाजपच्या काळात राज्य अधोगतीला गेले, असे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राजकीय विश्लेषक म्हणून सांगतो, मोदी किंवा भाजपचा कुणीही व्यक्ती आता पंतप्रधान होणार नाही. मोदी यांनी फसवणूक केल्यामुळे यावेळी परिवर्तन घडणार आहे.
सुशिलकुमार शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू घटनेचा खून करून वंचित आघाडीच्या नावाने ‘वोट काटो’ ही मोहीम जातीयवादी पक्षांसाठी राबवत आहेत. मोदी यांना हुकूमशाही आणायची आहे. त्यांनी मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना घरी बसविले. पक्षातही त्यांनी हुकूमशाही राबवली. धनंजय मुंडे म्हणाले, ही निवडणूक लोकशाही की हुकूमशाही हे ठरविणारी आहे़ मोदी विकासावर बोलण्याऐवजी काँगे्रस, राष्ट्रवादीवर टीका करीत आहेत़ ज्या शाळेत मोदी शिकले, ज्या स्टेशनवर त्यांनी चहा विकला असे ते सांगतात ती शाळा ते स्टेशन काँगे्रसने बांधले आहे़ नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडियातून देशाला काय फायदा झाला, हे सांगा? असा सवाल त्यांनी केला. यावेळी सुधीर तांबे, अविनाश आदिक, वैभव पिचड, विनायक देशमुख, सत्यजित तांबे, आशुतोष काळे आदींची भाषणे झाली. नामदेव कांडाळ यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

राहुल यांची ती तीस मिनिटे....
च्राहुुल गांधी सभेसाठी सात वाजता येणार होते. मात्र विमानात बिघाड झाल्यामुळे नाशिक विमानतळावरच ते रात्री आठ वाजता पोहोचले. सभास्थळी त्यांने ९.२५ वाजता आगमन झाले. व्यासपीठावर येताच प्रत्येकाजवळ जात त्यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर धनंजय मुंडे व बाळासाहेब थोरात या दोघांचीच भाषणे झाली.
च्राहुल यांनी अर्धा तास भाषण केले. आचारसंहितेमुळे दहा वाजता सभा संपवावी लागते. त्यामुळे त्यांनी बरोबर दहाच्या ठोक्याला आपले भाषण थांबविले.

Web Title: Billionaire absconding, in farmer's prison: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.